शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

नागपूर जिल्हा परिषदेच्या १५ सर्कलचे आरक्षण बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 11:29 PM

आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाच्या सोडतीवर न्यायालयात आक्षेप घेतल्याने व काही सर्कलचा समावेश नगरपरिषद व नगर पंचायतमध्ये झाल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करून, आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत जवळपास १५ सर्कलचे आरक्षण बदलले. त्यामुळे या सर्कलच्या सदस्यांच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. काही सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली तर काही सुखावलेही.

ठळक मुद्देशेंडे, कंभाले, गेडाम, यादव आदींना फटकाअध्यक्ष सावरकर, माजी अध्यक्ष गोतमारे ‘सेफ’डोणेकर, कुंभारे, चव्हाण, मानकर, चिखलेंचे पुनर्वसन नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाच्या सोडतीवर न्यायालयात आक्षेप घेतल्याने व काही सर्कलचा समावेश नगरपरिषद व नगर पंचायतमध्ये झाल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करून, आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी नव्याने झालेल्या आरक्षण सोडतीत जवळपास १५ सर्कलचे आरक्षण बदलले. त्यामुळे या सर्कलच्या सदस्यांच्या अपेक्षावर पाणी फेरले गेले. काही सदस्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली तर काही सुखावलेही.नव्याने झालेल्या सोडतीचा फटका संजय शेंडे, नाना कंभाले, दीपक गेडाम, शिवकुमार यादव आदींना बसला आहे. यावेळी आरक्षणात त्यांनी आपले मतदारसंघ गमावले आहेत. जि.प.च्या विद्यमान अध्यक्ष निशा सावरकर व माजी अध्यक्ष संध्या गोतमारे यांचे मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच सेफ राहिले तर विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर, माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांच्यासह विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे, सभापती उकेश चव्हाण, अरुणा मानकर यांना कुठलाही फायदा झाला नाही. त्यामुळे ते आता रिंगणातून बाद झाले आहेत.नव्या सर्कल पुनर्रचनेत कळमेश्वर तालुक्यातील ब्राह्मणी गावाचा समावेश कळमेश्वर पंचायत समितीमध्ये करण्यात आल्यामुळे या सर्कलचे नाव बदलून गोंडखैरी करण्यात आले. पारशिवनी नगर पंचायत झाल्याने पारशिवनी सर्कल बदलून करंभाड करण्यात आले. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगरपरिषद घोषित झाल्याने वानाडोंगरी सर्कल नामशेष करण्यात आले. त्याचबरोबर वडधामना, नेरीमानकर हे सर्कल रद्द करून त्याजागी खडकी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. उमरेड मध्ये सिर्सी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. सर्कलच्या पुनर्रचनेत बदल झाल्यानंतरही सदस्यांना काहीतरी अपेक्षा होती. परंतु आरक्षणाच्या सोडतीत त्यांचा अपेक्षाभंग झाला.सावनेर तालुक्यातील केळवद सर्कलमध्ये जुन्या आरक्षणात ना.मा.प्र. (महिला) आरक्षण आले होते. येथील विद्यामान सदस्य या अनु. जमातीच्या होत्या. त्यामुळे त्या बाद झाल्या होत्या. परंतु नव्या आरक्षणात हे सर्कल फक्त ना.मा.प्र. झाले. त्याचबरोबर पाटणसावंगी सर्कल जुन्या आरक्षणात अनु. जमातीसाठी आरक्षित होते. अनु.जातीचे सुरेंद्र शेडे हे येथील विद्यमान सदस्य होते. त्यांनी तेव्हाच अपेक्षा सोडली होती. आता नव्या सोडतीत या सर्कलच्या आरक्षणात बदल होऊन अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव झाला. उमरेड तालुक्यातील वायगाव सर्कल जुन्या सोडतीत अनु. जमाती (महिला) साठी आरक्षित झाले होते. येथील पद्माकर कडू हे खुल्या प्रवर्गातून २०१२ मध्ये निवडून आले होते. त्यामुळे त्यांनी अपेक्षा सोडली होती. परंतु नव्या आरक्षणाच्या सोडतीत हा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने घरच्या महिलेला रिंगणात उतरविण्याची संधी त्यांना मिळाली आहे.कुही तालुक्यातील राजोला सर्कलमध्ये जुने आरक्षण सर्वसाधारण निघाले होते. नव्या आरक्षणात ते ना.मा.प्र. प्रवर्गात आले. येथील विद्यमान सदस्य शालू हटवार यांच्या पतीने येथे दावा केला आहे. सभापती दीपक गेडाम यांचे सावनेर तालुक्यातील चिचोली सर्कलमध्ये जुन्या सोडतीत सर्वसाधारण (महिला) साठी राखीव झाले होते. नव्या सोडतीत आता अनु. जमाती (महिला)साठी राखीव झाले. दीपक गेडाम यांनी पूर्वीच वलनी सर्कलमध्ये लढण्याची इच्छा दर्शविली होती. पारशिवनी तालुक्यातील ना.मा.प्र. साठी आरक्षित झालेले माहुली सर्कल नव्या सोडतीत सर्वसाधारण झाले आहे. पारशिवनी नगर पंचायत झाल्याने माहुली हे सर्कल नव्याने तयार झाले. त्यामुळे विद्यमान उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनीही येथे दावा केला आहे. टेकाडी (को.ख.) हे सर्कल जुन्या सोडतीत अनु.जाती साठी होते. नव्या सोडतीत अनु.जाती (महिला) झाले आहे. येथून विद्यमान सदस्य शिवकुमार यादव हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले होते. दोन्ही आरक्षणाच्या सोडतीत त्यांना संधी मिळालेली नाही. कांद्री-सोनेघाट हे सर्कल जुन्या सोडतीत सर्वसाधारण होते. नव्या सोडतीत सर्वसाधारण (महिला) झाले आहे. येथून विद्यमान सदस्य शोभा झाडे या इच्छूक आहेत.कामठीत फेरबदल, कंभालेंना फटकाकामठी तालुक्यात नव्याने झालेल्या कोराडी सर्कलमध्ये निघालेले जुने आरक्षण हे खुल्या गटातील होते. त्यामुळे विद्यमान सदस्य नाना कंभाले यांनी जोर लावला होता. परंतु नव्या आरक्षणाच्या सोडतीत हा सर्कल सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या अपेक्षेवरच पाणी फेरले. गुमथळा मध्ये सुद्धा जुन्या आरक्षणात खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निघाले होते. नव्या सोडतीत हा सर्कल ना.मा.प्र. साठी आरक्षित झाला.हिंगण्यात सर्वाधिक फेरबदल सर्कलच्या पुनर्रचनेत आणि जुन्या-नवीनर आरक्षणाच्या सोडतीत सर्वात मोठा बदल हिंगणा तालुक्यात बघायला मिळाला. आॅक्टोबर २०१६ ला झालेल्या आरक्षणाच्या सोडतीत येथे आठ सर्कल होते. मात्र नव्या आरक्षणाच्या सोडतीत येथील वडधामना, नेरीमानकर, वानाडोंगरी हे सर्कल गाळण्यात आले तर खडकी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. त्याचबरोबर इसासनी सर्कलला गाळून डिगडोह-इसासनी हे नवीन सर्कल तयार करण्यात आले. त्यामुळे काही सर्कलमध्ये नवीन आरक्षण सोडतीत काही बदलही झाले. डिगडोह हे सर्कल जुन्या आरक्षणात सर्वसाधारण (महिला) साठी आरक्षित होते. नव्या सोडतीत ते ना.मा.प्र.(महिला) झाले. निलडोह सर्कल जुन्या सोडतीत ना.मा.प्र. साठी आरक्षित झाले होते. नव्या सोडतीत ते सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे हिंगण्यात बहुतांश नवीन चेहरे बघायला मिळतील.प्रशासनाने राबविलेला कार्यक्रमच नियमबाह्य : बाबा आष्टणकरनियमानुसार सर्व आरक्षण ५० टक्क्यावर जायला नको. परंतु जिल्हा परिषदेमध्ये ५७ टक्के सर्कल आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे जि.प.चे माजी सदस्य बाबा आष्टणकर यांनी ५७ टक्के आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यांची याचिका अद्यापही प्रलंबित आहे. दरम्यान १५ मार्च रोजी न्यायालयाने जि.प. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर १९ मार्चला यावर आष्टणकर यांनी न्यायालयात आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून स्पष्ट केले की, बाबा आष्टणकर यांच्या याचिकेच्या निकालाच्या आधीन राहून, पुढील कारवाईचे निर्देश देण्यात येईल. पत्रात असा स्पष्ट उल्लेख असतानाही प्रशासनाने सर्कलच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. यासंदर्भात त्यांनी भाजपा सरकारवर आक्षेप घेतला आहे. सरकारला निवडणूक घ्यायची नाही, सरकार न्यायालयाची व जनतेची दिशाभूल करीत आहे. यासंदर्भात ग्राम विकास मंत्रालयाने सुद्धा न्यायालयाला एक पत्र पाठवून २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या आधीन राहून कायद्यात बदल करण्याच्या कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. आयोगाचे पत्र व ग्राम विकास मंत्रालयाचे पत्रावरून स्पष्ट होते की, प्रशासनाने निवडणुकीसंदर्भात चालविलेला कार्यक्रम हे थोतांड आहे, असा आरोपही आष्टणकर यांनी लोकमतशी बोलताना केला.

अंतिम प्रभाग रचना व आरक्षण २३ रोजी              जिल्हा परिषद निवडणुकीकरिता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केल्यानंतर मंगळवारी जि.प. सर्कलची आरक्षण सोडत काढण्यात आली. ५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदमध्ये पुनर्रचनेत काही जुन्या सर्कलला नामशेष करण्यात आले, तर काही तालुक्यात नवीन सर्कल तयार करण्यात आले. निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा प्रशासनाने बचत भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी.एस. घुगे तसेच तहसीलदार मलिक वीराणी यांच्या नेतृत्वात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. शाळेकरी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चक्राक्रमानुसार ही सोडत काढली गेली. या सोडतीनंतरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. सदस्यांचे हे आक्षेप व तक्रारी ७ एप्रिलपासून १३ एप्रिल या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे करावयाच्या आहेत. आरक्षण अथवा सर्कल पुनर्रचनेसंदर्भात प्राप्त झालेल्या हरकती, तक्रारीसंदर्भात सुनावणी विभागीय आयुक्तांकडे होणार आहे. त्यानंतर २३ एप्रिलला अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर होणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरElectionनिवडणूक