रामटेक : तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी (दि. ९) जाहीर करण्यात आले. यातील ५० टक्के ग्रामपंचायतींचे सरपंचपद विविध प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला गेले आहे. यातील पाच ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती (तीन महिला), १९ ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमाती (९ महिला), १३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) (६ महिला) व ११ गावांमधील सरपंचपद सर्वसाधारण (६ महिला) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. या आरक्षणामुळे तालुक्यातील काही प्रस्थापितांना धक्का दिला आहे.
पंचाळा (खुर्द), खुमारी, हिवराहिवरी, पथरई व दाहाेदा येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले असून, यातील दाहाेदा, पंचाळा (खुर्द) व खुमारी येथील सरपंचपद महिलांच्या वाट्याला गेले आहे. कट्टा, बांद्रा, वरघाट, डाेंगरताल, खनाेरा, पुसदा (२), टांगला, चिकनापूर, पिल्कापार, लाेधा, करवाही, शीतलवाडी, साेनेघाट, पटगाेवरी, बाेरी, भिलेवाडा, लाेहडाेंगरी, काचूरवाही, आसाेली, किरणापूर येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केले असून, यातील पुसदा (२), टांगला, चिकनापूर, कट्टा, बांद्रा, शीतलवाडी, बाेरी, भिलेवाडा खनाेरा व काचूरवाही येथील सरपंचपद महिलांकडे गेले आहे.
नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) पुसदा (१), सालई, बाेर्डा, महादुला, कांद्री, खैरी बिजेवाडा, भंडारबाेडी, डाेंगरी, शिवनी (भाेंडकी), मांद्री, पिंडकापार, साेनपूर, नवरगाव व मुसेवाडी या ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या असून, यातील पुसदा (१), कांद्री, पिंडकापार, साेनपूर, डाेंगरी, खैरी बिजेवाडा व भंडारबाेडी येथील सरपंचपदी महिला विराजमान हाेणार आहेत.
बेलदा, बाेथीया पालाेरा, वडंबा (माल), उमरी, देवलापार, हिवराबाजार, मनसर, नगरधन, आजनी, चिचाळा व मानापूर येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केले असून, यातील बाेथीया पालाेरा, बेलदा, हिवराबाजार, नगरधन, देवलापार व चिचाळा ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलांच्या वाट्याला गेली आहे.
---
नऊ गावात लवकरच निवडणुका
तालुक्यातील देवलापार, दाहाेदा, पथरई, शिवनी (भाेंडकी), पंचाळा (खुर्द), मानापूर, चिचाळा, किरणापूर व खुमारी या नऊ गावांमध्ये येत्या काही दिवसात सार्वत्रिक निवडणुका हाेणार आहेत. त्यामुळे याही गावांना नुकतेच जाहीर केलेले आरक्षण लागू असणार आहे. सरपंचाची निवड ही थेट मतदारांमधून केली जाईल की सदस्यांमधून केली जाईल, याबाबत शासनाचा नवीन आदेश प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.