लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला.संतोष रामदास काळवे (२६) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. राज्य सरकारने त्याची फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले होते. तसेच, आरोपीने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. या दोन्ही प्रकरणावर एकत्र सुनावणी झाली. घटनेच्या वेळी साहील ऊर्फ यश नितीन बोरकर हा केवळ ११ वर्षे वयाचा होता. खापरी येथे त्याचे घर आहे. आरोपीही याच वस्तीत भाड्याने राहत होता. त्यामुळे आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकीर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला. तसेच, यशच्या वडिलाला जावेद खान या नावाने चारदा मोबाईल कॉल करून मुलगा पाहिजे असल्यास दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती. न्यायालयात आरोपीतर्फे अॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे व अॅड. कल्याणी देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
यश बोरकरच्या मारेकऱ्याच्या फाशीवर निर्णय राखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 9:04 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला.
ठळक मुद्देहायकोर्ट : प्रकरणावरील अंतिम सुनावणी पूर्ण