शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

नागपुरात निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनातून वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 7:07 PM

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने शुक्रवारी काम बंद आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनातून अतिदक्षता विभागा, अपघात विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झालेली नव्हती. मात्र वरीष्ठ डॉक्टरांना याचा फटका बसला. त्यांना सकाळी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), तर दुपारी वॉर्डात आपली सेवा द्यावी लागली.

ठळक मुद्देमेयो, मेडिकल : ओपीडी, वॉर्डात वरीष्ठांची सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने शुक्रवारी काम बंद आंदोलन करून लक्ष वेधले. या आंदोलनातून अतिदक्षता विभागा, अपघात विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे रुग्णसेवा प्रभावित झालेली नव्हती. मात्र वरीष्ठ डॉक्टरांना याचा फटका बसला. त्यांना सकाळी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी), तर दुपारी वॉर्डात आपली सेवा द्यावी लागली.डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात देशभरातील वैद्यकीय विश्व एकवटले आहे. मेयो व मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी सकाळी ८ वाजतापासून कामबंद आंदोलनाला सुरूवात केली. मेडिकलमध्ये सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे व अध्यक्ष डॉ. मुकूल देशपांडे यांच्या नेतृत्वात निषेध व्हिलचेअर रॅली काढण्यात आली. अपघात विभाग ते अधिष्ठाता कक्षापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये दोन डॉक्टरांना व्हिलचेअरवर बसविण्यात आले होते. जे डॉक्टर आपल्या प्राणाची बाजू लावून रुग्णांचा जीव वाचवितात, त्यांच्यावरच हल्ले वाढत असल्याचे हे प्रतिक असल्याचे डॉ. देशपांडे म्हणाले.ही रॅली अधिष्ठाता कक्षापर्यंत पोहचल्यानंतर निवासी डॉक्टरांनी जोरदारे नारेबाजी केली. यावेळी डॉ. डोंगरे व डॉ. देशपांडे यांनी उपस्थितांना कोलकाता येथील घटनेची माहिती देत निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. असे हल्ले खपवून घेतले जाणार नाही. संविधानिक मार्गाने मागण्या लावून धरण्यात येतील, असेही ते म्हणाले. दरम्यान आंदोलनकर्ता डॉक्टरांचे शिष्टमंडळ अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.या आंदोलनातून अपघात विभाग, अतिदक्षता विभाग व ट्रॉमा केअर सेंटर वगळण्यात आले होते. यामुळे मेयो, मेडिकलची रुग्ण सेवा फारशी प्रभावित झालेली नाही. कधी नव्हे ते वरिष्ठ डॉक्टर सकाळी ‘ओपीडी’मध्ये तर दुपारनंतर वॉर्डात ठाण मांडून होते.आंदोलन सुरूच राहणारशुक्रवरी काम बंद आंदोलनात सुमारे १२० निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. निवासी डॉक्टरांना जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत विविध मार्गाने हे आंदोलन सुरूच राहणार आहे. काळ्या फिती बांधून रुग्णसेवा व इतरही आंदोलनाचा माध्यामातून शासनाचे लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.डॉ. मुकूल देशपांडेअध्यक्ष मार्ड, मेडिकल

टॅग्स :doctorडॉक्टरagitationआंदोलन