लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधील ‘मार्ड’शी संबंधित निवासी डॉक्टरांनीसंपाचा इशारा दिला आहे. मेडिकलमधील मार्डचे अध्यक्ष डॉ. अर्पित धकाते यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मनपा व राज्य सरकारतर्फे केल्या जात असलेल्या उपाययोजना पुरेशा नाहीत. यामुळे मेडिकलमध्ये शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांवर दबाव वाढू लागला आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून निवासी डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे शैक्षणिक कार्य प्रभावित होत आहे. प्रशासन व सरकारने वेळीच लक्ष दिले नाही, तर नाईलाजास्तव संपावर जाण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी नॉन कोविड व इमर्जंसी सेवा देऊ शकणार नाही. तरीही अन्याय झाला तर प्रोफेशन सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही.