लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर- कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात देशभरातील वैद्यकीय विश्व एकवटले असून शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स दिवसभर काम बंद ठेवणार असून खासगी डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करणार आहेत.कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील डॉ. परिभा मुखर्जी या तरुण निवासी डॉक्टरवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी गेल्या आठवड्यात जीवघेणा हल्ला केला. डॉ. परिभा मुखर्जी यांची तब्येत अत्यवस्थ असून मृत्यूशी झुंज चालू आहे. या घटनेने अवघे वैद्यकीय विश्व हादरले आहे. देशभरातील इंडियन मेडिकल असोसिएशन, निवासी तसेच इन्टर्न्स डॉक्टरांच्या संघटनांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. आजकाल वैद्यकीय व्यावसायिक आणि रुग्णालयांवर हल्ले वाढत असून आयएमएने वेळोवेळी या विरुद्ध आवाज उठविला आहे. यावेळी देखील उद्या शुक्रवारी १४ जूनला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. देशभरात सर्व डॉक्टर्स काळ्या फिती लावून काम करतील, तसेच जागोजागी धरणे धरतील.केंद्र शासनाने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून, आरोग्य रक्षकांचे संरक्षण करावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी आदींनी केली आहे.देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करावी, डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवावी, केंद्र शासनाने यात हस्तक्षेप करावा, आदी मागण्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या देशभरासह नागपुरातील मेडिकल रुग्णालय, मेयो रुग्णालयातील निवासी डॉक्टर्स सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम बंद ठेवणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून बाह्यरुग्ण विभाग व इतर सर्व विभागात वैद्यकीय कामे डॉक्टर्स करणार नाहीत. त्यामुळे रुग्णसेवा विस्कळीत होणार आहे. मात्र, विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकांना रुग्णसेवेसाठी कटाक्षाने लक्ष देण्यास सांगितले असल्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा व मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले.
नागपुरात आज निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:05 AM
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर- कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांवरील प्राणघातक हल्ल्याच्या विरोधात देशभरातील वैद्यकीय विश्व एकवटले असून शासकीय ...
ठळक मुद्देखासगी डॉक्टर्स लावणार काळ्या फितीकोलकाताच्या डॉक्टरांवरील हल्ल्याचा देशभर निषेध