शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चुकीच्या सरकारी निर्णयांचा विरोध करा : कन्नन गोपिनाथन यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 9:02 PM

चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले.

ठळक मुद्दे‘संविधान जागर’वर व्याख्यान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : केंद्र सरकार ऐतिहासिकच्या नावावर मूर्खपणाचे निर्णय घेत आहे. कलम-३७०, सीएए व एनआरसी हे निर्णय छुप्या धोरणाच्या अंमलबजावणीचे संकेत देत आहेत. या परिस्थितीत संविधानाचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी सरकारला प्रश्न विचारायला सुरुवात करावी. चुकीच्या निर्णयाचा कायदेशीर मार्गाने विरोध करावा, असे आवाहन कलम-३७० रद्द करण्याच्या विरोधात राजीनामा देणारे सनदी अधिकारी कन्नन गोपिनाथन यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना व फ्रेन्डस् ऑफ डेमोक्रेसी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी धरमपेठेतील वनराई परिसरस्थित वसंतराव नाईक सभागृहामध्ये आयोजित ‘संविधान जागर’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.गोपिनाथन यांनी नोटाबंदी, कलम ३७० रद्द करणे, जीएसटी, सीएए व एनआरसीचा विरोध केला. हे सरकार १९५० मध्ये निश्चित केलेल्या धोरणाची हळूहळू अंमलबजावणी करीत आहे. सरकारचे मनसुबे शुद्ध नाहीत. नागरिकांनी त्यांना पारदर्शी कारभारासाठी निवडून दिले, पण ते चाणक्यनीतीने वागत आहेत. त्यांना वेळीच थांबवणे आवश्यक आहे. सरकारने जनतेच्या कल्याणाकरिता कार्य करणे अपेक्षित आहे. परंतु, हे सरकार आधी जनतेचे अधिकार हिसकावून त्रास देते व त्यानंतर तेच अधिकार परत करून आपला मोठेपणा मिरवते. ही कला अधिक काळ टिकणार नाही. सरकारने ऐतिहासिकच्या नावावर आतापर्यंत घेतलेल्या एकाही निर्णयाने काहीच चांगले साध्य केले नाही. उलट देशाला अस्थिरतेच्या खाईत लोटले. नोटाबंदी झाल्यानंतर १२५ नागरिकांना प्राण गमवावे लागले. कलम ३७० रद्द झाल्यानंतर दहशतवाद संपला नाही. पण काश्मिरी नागरिकांच्या मनात कटुता निर्माण झाली, असे गोपिनाथन यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे यांनी प्रास्ताविक तर, घापेश ढवळे यांनी गोपिनाथन यांचे स्वागत केले.नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकारनागरिकांना कायदेशीर मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. अशा आंदोलनाला दडपले जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या कारवाईची भीती सोडून देशाच्या कल्याणाकरिता चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलने केली पाहिजेत, असे मत गोपिनाथन यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Governmentसरकारnagpurनागपूर