लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रत्येकाशी चांगले बोलावे, गोड बोलावे असे नेहमीच सांगितले जाते. ते एकप्रकारे बरोबरही आहे. परंतु एखादी व्यक्ती खूप अडचणीत असेल, तेव्हा त्याच्याशी खूप गोड बोलूनही त्याची समस्या सुटत नसेल तर त्याचा काय फायदा? याऐवजी त्या व्यक्तीची समस्या सोडविणे आवश्यक आहे. त्याची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे ठरेल, असे मला वाटते.झ्याकडे अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीची नेमकी समस्या काय आहे? ते नीट समजून ती सोडवण्याचा प्रयत्न मी करतो. समोरच्या व्यक्तीची समस्या सुटेल, असा सल्ला त्याला देतो. माझ्या दृष्टीने माझ्याकडे समस्या घेऊन येणाºया व्यक्तीची समस्या सोडवणे हे गोड बोलण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.जिल्हाधिकारी असल्याने दररोज शेकडो लोक भेटायला येतात. आपण सर्वांसोबतच सामान्यपणे चांगलेच बोलत असतो. भेटायला येणारे नागरिक हे आपापल्या अडचणी घेऊन येत असतात. तेव्हा त्यांच्याशी नुसतेच गोड बोलून कसे होणार? त्यांची समस्याही सुटायला हवी ना. समस्या सुटत नसेल आणि केवळ गोड बोलून त्या व्यक्तीची बोळवण केली जात असेल तर त्या गोड बोलण्यालाही काहीही अर्थ नाही. त्यामुळे माझा नेहमीच असा प्रयत्न राहतो की, समोरची व्यक्ती ही पूर्ण समाधानी व्हावी. त्याची जी काही समस्या असेल ती सोडविली जावी. यासाठी त्याला योग्य सल्ला देणे. समजावून सांगणे आवश्यक आहे.आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असावाच. परंतु त्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखत असेल तर त्याच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत, तसे त्याला समजावूनही सांगा. म्हणजे त्यालाही फार बरे वाटेल. गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या.
गोड बोलण्यापेक्षा समोरच्याची समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:25 AM