शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

घरोघरी, मंदिरात गुंजला ‘जय जिनेंद्र’चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 11:23 PM

जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महावीर उद्यानात शोभायात्रेचा समारोप झाला. चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीजी ची रथयात्रा मोठ्या उत्साहात श्री दिगंबर जैन परवान मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्व जैन मंदिरात, घराघरात ‘जय जिनेंद्र’चा जयघोष करण्यात आला.

ठळक मुद्देभगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त निघाली शोभायात्रा : जागोजागी झाले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त गुरुवारी जैन सेवा मंडळाच्यावतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. श्री दिगंबर जैन परवार मंदिर इतवारी येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. महावीरनगरातील महावीर उद्यानात शोभायात्रेचा समारोप झाला. चैत्र मास कृष्ण पक्ष त्रयोदशीला भगवान महावीरांचा जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त श्रीजी ची रथयात्रा मोठ्या उत्साहात श्री दिगंबर जैन परवान मंदिर येथून सकाळी ७.३० वाजता काढण्यात आली. यानिमित्त शहरातील सर्व जैन मंदिरात, घराघरात ‘जय जिनेंद्र’चा जयघोष करण्यात आला.शोभायात्रेतील रथावर भगवान महावीर यांची प्रतिमा होती. चंद्रप्रभू मंदिर येथून श्री भगवान महावीर यांची मूर्ती विराजमान असलेला चांदीचा रथ होता. शोभायात्रेत मुनिश्री प्रणामसागर, प्रशमरती विजयजी म.सा. हे सुद्धा चालत होते. त्यांच्या मागे महिला व पुरुष भजन गात होते. शोभायात्रेत श्री कुंदकुंद दिगंबर जैन स्वाध्याय मंडळ ट्रस्ट नेहरू पुतळा येथील बालकांनी विशेष सादरीकरण केले. श्री परवारपुरा महिला मंडळाद्वारे दिव्यध्वनी वाद्याचे सादरीकरण संपूर्ण रथयात्रेत करण्यात आले. श्री नंदनवन दि. जैन बघेरवाल महिला मंडळाद्वारे विशेष नृत्य संपूर्ण शोभायात्रेदरम्यान सादर करण्यात आले. श्री दिगंबर जैन जागरण, पुलक जन महिला मंच, नागदा समाज, सैतवाल संघटन मंडळ, महावीरनगर द्वारे शोभयात्रेत आकर्षक चित्ररथ साकारण्यात आले होते.शोभायात्रा महावीर उद्यानात पोहचल्यानंतर उज्वल पगारिया यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर तुळशीनगर येथील सजय महिला मंडळाकडून मंगलाचरण करण्यात आले. प्रफुलभाई दोशी, श्रवण दोशी व अन्य अतिथींनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी राज्यसभा सदस्य अजय संचेती, प्रमुख अतिथी खासदार कृपाल तुमाने, आमदार गिरीश व्यास, नगरसेविका शितल कांबळे, प्रशांत कांबळे, चंद्रकांत वेखंडे, जितेंद्र जैन लाला, सतेंद्र जैन मामू, लोकेश पाटोदी, पंकज बाबरिया, दिगंबर जैन तीर्थरक्षा कमिटीचे महामंत्री संतोष जैन पेंढारी राकेश पाटनी, पंकज बोहरा प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान आमदार गिरीश व्यास म्हणाले की, मुनिश्री डॉ. प्रणामसागर यांना ज्या अर्थनीती प्रबंधासाठी डीलिट उपाधी मिळाली आहे ही नीती भारतात लागू केल्यास देशाचा विकास होईल. या दरम्यान अजय संचेती म्हणाले की, समाजाप्रति माझे जे कर्तव्य आहे, त्याचे चांगल्या पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न करेल. नगरसेविका शितल कांबळे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष सतीश पेंढारी जैन, मंत्री पीयूषभाई शाह, उपाध्यक्ष शरद मचाले, डॉ. कमल पुगलिया, कोषाध्यक्ष विजय उदापूरकर, प्रचार प्रसार मंत्री हिराचंद मिश्रीकोटकर, उपमंत्री संजय टक्कामोरे, रवींद्र वोरा, महिला समितीच्या अध्यक्ष कश्मिरा पटवा, मंत्री सरिता ठोल्या, उपाध्यक्ष अमिता बरडिया, वंदना जैनी, कोषाध्यक्ष पिंकी पहाडिया, उपमंत्री शीला उदापूरकर, अनिता मोदी, महिपाल सेठी, हरीश जैन मौदावाले, रिंकू जैन, राजू सिंघवी, संजय जैन, विजय कोचर, योगेंद्र शहा, दिलीप पाटनी, मनिष छल्लानी, निर्मल कोठारी विपुल कोठारी, अनामिका मोदी, सरोज मिश्रीकोटकर, सुरेश आग्रेकर, दिलीप राखे, महेंद्र क टारिया, मगनभाई दोशी, रोहित शाह, सुभाष कोटेचा, प्रशांत सवाने, घनश्याम मेहता, देवेंद्र आग्रेकर, चैतन्य आग्रेकर, उदय जोहरापूरकर, कमल बज, सीमा डोणगांवकर यांचे सहकार्य लाभले.भगवान महावीर जयंतीनिमित्त निघाली भव्य रथयात्राअखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंचच्यावतीने भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. इतवारी शहीद चौक येथे रथयात्रेचे स्वागत नगरसेविका आभा पांडे व संजय महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. पं. बच्छराज व्यास चौकात आमदार गिरीश व्यास मित्र परिवाराकडून स्वागत करण्यात आले. किल्ला रोड, महाल येथे विजय भुसारी परिवाराने रथयात्रेचे स्वागत केले. अनेक संस्थांनी रथयात्रेच्या मार्गावर पुष्पवर्षा करून स्वागत केले. रथयात्रेनिमित्त विविध संस्थांनी विविध खाद्य पदार्थांचे वितरण केले. या रथयात्रेत दिनेश सावलकर यांच्या नेतृत्वात २४ आकर्षक रथ काढण्यात आले. यात पुलक जन चेतना मंच शाखा महावीर वॉर्ड यांची झाकी सहभागी झाली होती. रथयात्रेत पंचपरमेष्टी लोकसेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहयोग दिला.

टॅग्स :Bhagavan Mahavir Janmotasavभगवान महावीर जन्मोत्सवnagpurनागपूर