राष्ट्रीयकृत २० बँकांद्वारे मार्गदर्शननागपूर : विदर्भातील तरुणांना स्वत:चा व्यवसाय अथवा उद्योग सुरू करण्यासाठी विनातारण व सुलभपणे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी प्रधानमंत्री मुद्र्रा योजनेच्या विविध योजनांची माहिती युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रीयकृत तसेच खाजगी विविध २० बँकांनी पुढाकार घेऊन युवकांसाठीच्या कर्ज मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहाच्या परिसरात युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आली असून या मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी हजारो तरुण-तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुद्रा बँक जिल्हा समन्वय समितीतर्फे छोटे व्यावसायिक, उद्योजक व उद्यमशील युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रधान मंत्री मुद्रा योजनेमध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक खातेदारांना प्रधानमंत्री योजनेचा लाभ नागपूर जिल्ह्यात मिळाला आहे. युथ एम्पॉवरमेंट समिटच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या हजारो युवकांपर्यंत प्रधान मंत्री मुद्रा योजनेसंदर्भात माहिती देण्यासोबतच योजनेतील कर्जासाठी अर्जाचे फार्म वितरित करून येथेच भरून घेण्यात येत आहेत. प्रधान मंत्री मुद्रा योजना कर्ज मेळाव्यासाठी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, कॅनरा बँक, आयडीबीआय, कॉपोर्रेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, सिंडीकेट बँक, युको बँक, विजया बँक, युनियन बँक, विदर्भ कोकण ग्रामीण विकास बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय,एक्सीस बँक आदी बँकांनी सहभाग घेतला आहे.जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने युवकांसाठी प्रधान मंत्री मुद्रा योजनेची माहिती, अर्जाचे नमुने तसेच लोकराज्य अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. लोकराज्य अंकाच्या दालनालाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. (प्रतिनिधी)मुद्रा लोनचे लाभार्थ्यांना वितरण रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनपसंगी मुद्रा लोन अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना विविध बँकेअंतर्गत कर्ज मंजूर झाले आहे, अशा लाभार्थ्यांना कर्जपत्राचे वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री मुद्र्रा योजनेच्या कर्ज मेळाव्यास प्रतिसाद
By admin | Published: March 26, 2017 1:46 AM