कळमेश्वर : कळमेश्वर शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड लसीकरणासाठी पुढे येण्यासाठी तालुका आणि न.प.प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आला. याला प्रतिसाद देत ग्रामस्थ लसीकरण केंद्राकडे वळले. आता मात्र तालुक्यातील विविध केंद्रावर लसीचा तुडवडा जाणवत असल्याने ही मोहीम थंडावण्याची शक्यता आहे.
गुरुवारी कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय व एमआयडीसी येथे लसीकरण सुरु होते. मात्र एमआयडीसी केंद्रावर लस नसल्याने दुपारी १२:३० वाजेपर्यंत लसीकरण बंद होते. त्यानंतर लसीकरण सुरू झाल. उद्या, शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरु राहील तर एमआयडीसी केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मांडवी व परसोडी येथे लस नसल्याने लसीकरण झाले नाही. शुक्रवारी ग्रामीण भागातील १० केंद्रावर लसीकरण होईल इतर ठिकाणी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे.
-
तालुक्यात लसीचा तुडवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात दिवसभर लसीकरण चालू होते. एमआयडीसी केंद्रावर दुपारी १२:३० नंतर लसीकरण झाले. डीएचओ कडून लस येते. उद्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण चालू राहील. एमआयडीसी केंद्र बंद ठेवण्यात आले आहे.
- डॉ प्रीती इंगळे
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर