नागपूर : कोरोना संक्रमणाचा धोका कमी झाल्याने शहरातील रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी नवीन आदेश जारी केले आहेत. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुकाने, रेस्टाॅरंट, हॉटेल्स यासह विविध आस्थापनांच्या कामाच्या वेळेवरील निर्बंधामुळे गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रेस्टाॅरंट आणि भोजनालये रात्री १२ पर्यंत तर अन्य आस्थापना रात्री ११ पर्यंत सुरू ठेवता येतील.