लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार आहेत.रेस्टॉरन्ट आणि बार व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो लोक जुळले आहेत. नागपुरात अडीच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरन्ट आणि तेवढेच फूटपाथवर खाद्य विक्रेते आहेत. या माध्यमातून जवळपास २५ ते ३० हजार लोकांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरन्ट व्यवसायाशी जुळलेल्या असोसिएशनसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. ५० टक्के उपस्थितीसह परवानगी दिली आहे. एका टेबलवर दोन वा तीन व्यक्तींना बसण्याची परवानगी राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारने या संदर्भात निर्णय घेण्याचे आवाहन राज्य शासनाला केले होते. या अंतर्गत काही राज्यात रेस्टॉरन्ट सुरू झाले आहेत. पण महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शासनाने रेस्टॉरन्ट आणि बार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती.
पुरवठादारांचा कच्च्या मालाचा व्यवसाय वाढणारनागपुरात रेस्टॉरन्ट आणि बारची संख्या जास्त आहे. या प्रतिष्ठानांमध्ये असंघटित क्षेत्रातील सर्वाधिक लोक काम करतात. त्यांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचा व्यवसाय वाढणार आहे. पूर्वी काऊंटरवरून मद्य विक्रीला परवानगी होती. पण बार सुरू होताच ग्राहकांची संख्या वाढेल, असे बार संचालकांनी सांगितले. याशिवाय फूटपाथवर विक्री करणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होणार आहे.हॉटेल व रेस्टॉरंट संचालकांनी सांगितले की, पूर्वी पार्सलला परवानगी होती. आता शासनाच्या परवानगीने व्यवसायात पुन्हा उत्साह येणार आहे. ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करून रेस्टॉरन्टमध्ये यावे लागेल. याशिवाय आम्हीही नियमांतर्गत व्यवसाय चालविणार आहोत. एका वा दोन दिवसात शासनाची नियमावली येणार आहे.असे असतील नियमरेस्टॉरन्ट व बारमध्ये ५० टक्के अर्थात एका टेबलवर दोन वा तीन जणांना परवानगीसॅनिटायझरची व्यवस्था मालकांना करावी लागणारग्राहकांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारककर्मचाऱ्यांना मास्क व ग्लोव्हज बंधनकारकवेळेचे बंधन पाळावे लागणाररेस्टॉरन्ट व बार नियमित सॅनिटाईज करणे बंधनकारक