नागपूर : राज्य शिक्षण मंडळ बारावीचा निकाल २ ऑगस्टपर्यंत घोषित करू शकते. सर्व विभागीय शिक्षण मंडळाचे बारावीच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे. बोर्डाच्या मुख्यालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निकाल घोषित करण्यास परवानगी दिली आहे.
सूत्रांनी सांगितले की बैठकीत विभागीय अधिकाऱ्यांनी बारावीचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले. बोर्ड लवकरच निकालाची तारीख घोषित करू शकते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बोर्ड २ ऑगस्टपर्यंत निकाल घोषित करू शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती राज्य सरकारला देण्यात येईल. तसेच निकाल घोषित करण्यासाठी सरकारकडून परवानगी घेण्यात येईल. सूत्रांनी सांगितले की शनिवारी बोर्डाकडून राज्य सरकारला यासंदर्भात पत्र पाठविले आहे. रविवारी सरकारची परवानगी मिळाल्यानंतर निकालाची तारीख घोषित होऊ शकते.