शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

४५ विषयांचा निकाल ‘शंभर नंबरी’; फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी ९८ टक्क्यांच्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2023 9:00 AM

Nagpur News गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तर विज्ञान शाखेत इंग्रजीचा निकाल तुलनेने कमी लागला.

योगेश पांडे

नागपूर : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालामध्ये नागपूर विभागात फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला. तर विज्ञान शाखेत इंग्रजीचा निकाल तुलनेने कमी लागला. व्होकेशनल अभ्यासक्रमांशी संबंधित विषयांचे निकालदेखील कमी लागले. यंदा एकूण विषयांपैकी सुमारे ३६ टक्के म्हणजेच ४५ विषयांचे निकाल ‘सेंट परसेंट’ लागले आहेत. मागील वर्षी हाच आकडा ४३ टक्के इतका होता.

यंदा बारावीला एकूण १२८ विषय होते. त्यातील ४५ विषयांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. तर २६ विषयांचे निकाल ९९ टक्के किंवा त्याहून अधिक लागले आहेत.

बारावीत गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटत असते. कोरोनाच्या अगोदरपर्यंत गणिताचा निकाल ९० टक्क्यांच्या जवळपास राहायचा. मागील वर्षी गणिताचा निकाल ९९.६० टक्के होता. या वर्षी त्यात घट झाली असून, हा आकडा ९६.७४ टक्क्यांवर घसरला. फिजिक्स (९८.१७%), बायोलॉजी (९८.४७%) व केमेस्ट्री (९८.४९ %) या विषयांचा निकालदेखील चांगला लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यातदेखील एका टक्क्याची घट आहेच. मराठीचा निकाल ९३.३९ टक्के, तर हिंदीचा निकाल ९७.२७ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तीन विषयांना १० च्या आत परीक्षार्थी

यंदा १२८ पैकी २४ विषयांमध्ये ५० किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. तीन विषयांमध्ये तर १० हून कमी परीक्षार्थी होते. विभागात सर्वांत अधिक १ लाख ५३ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली. तर १ लाख १ हजार ९४८ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.

शंभर टक्के निकाल लागलेले विषय

- तमिळ,  बंगाली,  फ्रेंच,  जापानीज्, जिऑलॉजी, ड्रॉईंग, हिस्ट्री ऑफ आर्ट्स, हिस्ट्री ॲण्ड डेव्हरमेन्ट ऑफ म्युझिक, व्होकेशनल क्लासिकल म्युझिक, कृषी विज्ञान, डिफेन्स स्टडीज्, इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स, स्कूटर सर्व्हिसिंग, जनरल सिव्हिल इंजिनीअरिंग,  ऑफिस मॅनेजमेंट,  स्मॉल इंडस्ट्रीज ॲण्ड सेल्फ एम्प्लॉयमेन्ट,  क्रॉप सायन्स, हॉर्टिकल्चर, ऑटोमोबाइल सर्व्हिस टेक्निक,  हेल्थकेअर जनरल ड्युटी,  ब्युटी थेरपिस्ट,  स्पोर्ट्स फिटनेस ट्रेनर,  ॲग्रिकल्चर मायक्रो इरिगेशन टेक्नॉलॉजी,  ट्रेड प्रॅक्टिकल,  मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-१,  मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-२,  मेकॅनिकल टेक्नॉलॉजी-३,  क्रॉप सायन्स-१,  क्रॉप सायन्स-२,  क्रॉप सायन्स-३,  रेडिओलॉजी टेक्निशिअन-१,  रेडिओलॉजी टेक्निशिअन-२,  रेडिओलॉजी टेक्निशिअन-३,  चाईल्ड ओल्ड एज केअर-१,  चाईल्ड ओल्ड एज केअर-२,  चाईल्ड ओल्ड एज केअर-३,  ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-१,  ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-२,  ऑप्थॅल्मिक टेक्निशिअन-३,  फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-१,  फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-२,  फूड प्रोडक्ट्स टेक्नॉलॉजी-३,  टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-१,  टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-२, - टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट-३, 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल