शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

‘टायर्ड’ विद्यापीठाला ‘रिटायर्ड’चा आधार

By admin | Published: May 17, 2015 3:01 AM

वाढलेला कामाचा ताण अन् कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे चक्क सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ

नागपूर : वाढलेला कामाचा ताण अन् कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे चक्क सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याची वेळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर आलेली आहे. परंतु तंत्रज्ञानाचे ज्ञान तर सोडाच परंतु साधी ‘नोटशीट’देखील नीट लिहू न शकणाऱ्या काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचादेखील यात समावेश आहे. विद्यापीठाला ‘टेक्नोसॅव्ही’ करण्याचा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचा संकल्प आहे. परंतु अशा स्थितीत नव्या योजनांची अंमजबजावणी करून खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर विद्यापीठ कधी जाणार व ‘टेक्नोसॅव्ही’ रुप कसे येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर विद्यापीठात अद्याप शिक्षकेतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदभरती न झाल्याने विविध विभागांवर प्रचंड ताण आलेला आहे. यामुळे परीक्षा विभागाच्या कामावर सर्वात जास्त परिणाम होत आहे. पदभरती करण्याचे सोडून विद्यापीठाने यावर वेगळाच मार्ग शोधून काढला आहे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यास विद्यापीठाने सुरुवात केली आहे. यातील सुमारे १० अधिकारी तर एप्रिल महिन्यातच रुजूदेखील झाले. शिवाय या आठवड्यातदेखील विद्यापीठाने २ ते ३ सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना रुजू होण्यासंदर्भात पत्र दिले आहे.हे कर्मचारी व अधिकारी सुमारे दीड लाख पदवी प्रमाणपत्रांचे वाटप तसेच प्राधिकरणांच्या निवडणुकांच्या कामात सहभागी होणार आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे यातील अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानाचा गंधदेखील नाही. कुलगुरूंच्या ‘व्हीजन’मध्ये कुठेही हे लोक ‘फिट’ बसत नाहीत. परंतु तरीदेखील प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी नाईलाजाने त्यांची सेवा विद्यापीठाला घ्यावी लागत आहे. (प्रतिनिधी)