शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

तक्रारकर्त्याचे ४.८० लाख १८ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

नागपूर : फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाचे ४ लाख ८० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त ...

नागपूर : फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्या ग्राहकाचे ४ लाख ८० हजार रुपये १८ टक्के व्याजासह परत करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने इन्फ्राटेक रियल इस्टेट कंपनीला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही इन्फ्राटेकनेच द्यायची आहे.

चार लाख ८० हजारापैकी २ लाख ४० हजार रुपयावर ५ नोव्हेंबर २००९ तर, उर्वरित रकमेवर १९ जानेवारी २०११ पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले आहे. कंपनीला या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास, पुढील कालावधीत रोज ५० रुपये अतिरिक्त नुकसानभरपाई अदा करावी लागेल, असे कंपनीला सांगण्यात आले आहे. देवेंद्र नाकाडे असे पीडित ग्राहकाचे नाव असून ते देसाईगंज, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहेत. त्यांची तक्रार आयोगाच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी निकाली काढली.

नाकाडे यांनी इन्फ्राटेक कंपनीच्या मौजा पिपरी, ता. कुही येथील ‘मार्वेल’ योजनेतील एक विला १२ लाख ५ हजार रुपयात खरेदी केली. तसेच, कंपनीला दोन किस्तीमध्ये ४ लाख ८० हजार रुपये अदा केले. परंतु, कंपनीने योजनेच्या ठिकाणी काहीच बांधकाम केले नाही. नाकाडे यांना विलाचा ताबा देण्यात आला नाही. विक्रीपत्र करून देण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, कंपनीने आयोगाची नोटीसही स्वीकारली नाही. त्यामुळे तक्रारीवर एकतर्फी कार्यवाही करण्यात आली.

-----------------

सेवेत त्रुटी ठेवली

इन्फ्राटेक कंपनीला योजनेसाठी आवश्यक परवानग्या घेणे शक्य नव्हते तर, त्यांनी यासंदर्भात तक्रारकर्त्यांना कळवून त्‍यांच्याकडून स्वीकारलेली रक्‍कम व्‍याजासह परत करायला पाहिजे होती. परंतु, कंपनी तक्रारकर्त्याकडून स्वीकारलेल्या रकमेचा आजतागायत वापर करीत आहे. सदर कृती सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब दर्शविते, असे निरीक्षण आयोगाने निर्णयात नोंदवले.