लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील निरनिराळ्या सहकारी व खासगी वित्तीय संस्था, बँका, सोसायटीमधील घोटाळा करणाऱ्या संचालकांवर कारवाई करून पीडित ठेवीदारांना न्याय देण्याच्या मागणीसाठी लोक जागृती मोर्चाच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.लोक जागृती मोर्चातर्फे यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी नागरिकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून आपला आवाज बुलंद केला. मोर्चातील अॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचे यांच्या शिष्टमंडळाने वित्त व सहकार मंत्री यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी चार दिवसात शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.नेतृत्व : अॅड. रमण सेनाड, राजेश नाईक, प्रशांत नाईक, अॅड राजेंद्र गिल्लुरकर, संदीप केचेमागण्या :१) ठेवीदारांच्या ठेवी शासनाने मध्यस्थी करून परत कराव्या२) संचालकांच्या खासगी मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत करावे३) कुठल्याही ठेवी ठेवताना इन्शुरन्स करून ठेवण्याची तरतूद करावी४) घोटाळ्याची चौकशी सुरु असताना संचालकांना मालमत्ता विकता येणार नाही असा नियम करावा
ठेवीदारांच्या ठेवी परत करा : पीडित ठेवीदारांचा लोक जागृती मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:48 AM