लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्लीतील मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षास संपर्क करावा. जे नागरिक स्वत:हून संपर्क करणार नाहीत अशांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी निर्देश दिले.दिल्लीतील निजामुद्दीन येथे आयोजित मरकज संमेलनास उपस्थित राहिलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण विभागात विलगीकरण केंद्रामार्फत तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाने पाठविलेल्या यादीनुसार मरकजला उपस्थित राहिलेल्या विभागातील नागरिकांचा शोध घेऊन विलगीकरणात आरोग्य तपासणी सुरू आहे. परंतु अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्हा नियंत्रण कक्षास माहिती देणे बंधनकारक आहे. ज्यांनी अद्यापपर्यंत माहिती दिली नाही असे प्रशासनाच्या लक्षात आल्यास त्यांच्या विरुद्ध भारतीय दंड संविधान कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.मरकजहून नागपूर येथे परतलेल्या नागरिकांसाठी आमदार निवास, वनामती व रविभवन येथे सुरू करण्यात आलेल्या विलगी केंद्रात सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वत:हून जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.जिल्हानिहाय कोरोना नियंत्रण कक्षकार्यालयाचे नाव दूरध्वनी क्रमांकजिल्हाधिकारी, नागपूर ०७१२-२५६२६६८नागपूर महानगरपालिका ०७१२- २५६७०२१जिल्हाधिकारी, वर्धा ०७१५२-२४३४४६जिल्हाधिकारी, भंडारा ०७१८४-२५१२२२जिल्हाधिकारी, चंद्रपूर ०७१७२-२७२४८०जिल्हाधिकारी, गडचिरोली ०७१३२-२२२०३१जिल्हाधिकारी, गोंदिया ०७१८२-२३०१९६