प्रयास ग्रुपतर्फे शालेय साहित्याचे वितरण
नागपूर : बी. जी. श्रॉफ गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रयास ग्रुपच्या वतीने शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश वाघमारे, प्राचार्या चित्रा दौलतानी, विनोद कोचर, संतोष अग्रवाल, हितेश मोहनानी, कमल अग्रवाल, वरिष्ठ शिक्षिका शोभना बेलगमवार उपस्थित होते.
सिंधीज गॉट टॅलेंटमध्ये अंशिका पहिली
नागपूर : भारतीय सिंधू सभा मुंबईच्या वतीने सिंधीज गॉट टॅलेंट ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत शहरातील अंशिका टहलियानीने सिंधी गीत सादर करून प्रथम पुरस्कार मिळविला. स्पर्धेत देशभरातील १३५ स्पर्धकांनी हस्तकला, गायन, वादन, नृत्य आदींचे प्रदर्शन केले. अंशिकाला सुरमणी पंडित प्रभाकर धाकडे, वडील गिरीश आणि आई अरुणा यांचे मार्गदर्शन लाभले.
कलावंतांनी केले उत्कृष्ट प्रदर्शन
नागपूर : हार्मोनी इव्हेंट म्युझिक अँड डान्स अकॅडमीच्या वतीने पंजाबी बोल शास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेव्ह आर्ट सेव्ह आर्टिस्टअंतर्गत आयोजित या कार्यक्रमात कलावंतांनी उत्कृष्ट प्रदर्शन करून सर्वांची मने जिंकली. कार्यक्रमाची संकल्पना हार्मोनी इव्हेंटचे राजेश समर्थ यांची होती. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. आयोजनासाठी कत्थक गुरु उर्मिला राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात नमिता राऊत, अवंती दुधात, प्रज्ञा गादेवार, कीर्ती भिसीकर, साक्षी दडपाये, तनुश्री ढोबळे, वैष्णवी ढोबळे, चिन्मयी भिसीकर, येशरिता रोकडे, त्रिशा सारडा, राशी बोडे, परिधी राठी, कनक अरोरा यांनी भाग घेतला.
.............