लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मित्राची हत्या करून कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला सदर पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. यामुळे नागपुरातील हत्येची एक घटना टळली. पोलिसांनी पकडलेला आरोपी अक्षय किशोर बैसवारे ऊर्फ कनोजिया यानेच दस्तुरखुद्द ही माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. आरोपी बैसवारे हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड डोमॅनिक आणि तुर्केलने त्याच्यावर २४ जुलैला घातक शस्त्रांनी हल्ला चढवला होता. त्यावेळी त्याच्या मदतीला कृष्णा राजू नायर नामक मित्र धावला. बैसवारेच्या अंगावरचे वार नायरने झेलल्यामुळे तो बचावला आणि नायरचा मृत्यू झाला. गिट्टीखदानमधील त्रिकोणी पार्कजवळ घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी डोमेनिक आणि तुर्केलला अटक केली. त्यांना कारागृहात डांबण्यात आले. २३ नोव्हेंबरला ते कारागृहातून जामिनावर बाहेर आले. त्यापूर्वीच बैसवारेने त्याच्या हत्येची तयारी करून ठेवली होती. त्याने एक पिस्तूल आणि काडतूसही घेऊन ठेवले होते.बैसवारेचा गेम बिघडलारविवारी रात्री डोमॅनिकचा गेम करण्याच्या इराद्याने बैसवारे घरून निघाला. रात्री मिळाला तर ठीक नाही तर सोमवारी दिवसभरात डोमॅनिकचा गेम करण्याचा त्याने निश्चय केला होता. दरम्यान, बैसवारे पिस्तूल घेऊन हत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सदर पोलिसांना मिळाली. त्यावरून सदरचे ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चौरसिया, सहायक उपनिरीक्षक गोमासे, हवालदार विनोद तिवारी, संदीप पांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्री बैसवारेला तीन मुंडी चौकाजवळ पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले. त्याने हे पिस्तूल डोमॅनिकच्या हत्येसाठी वापरणार होतो, अशी कबुली दिली. पुढील तपास सुरू आहे.
खून का बदला खून ... नागपुरात पोलिसांमुळे टळला हत्येचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 9:46 PM
मित्राची हत्या करून कारागृहातून नुकताच जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीची हत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एकाला सदर पोलिसांनी पिस्तुलासह अटक केली. यामुळे नागपुरातील हत्येची एक घटना टळली. पोलिसांनी पकडलेला आरोपी अक्षय किशोर बैसवारे ऊर्फ कनोजिया यानेच दस्तुरखुद्द ही माहिती दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे आरोपी पिस्तुलासह गजाआड