बेलाेना : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यात गावात वाढत असलेले काेराेना संक्रमण राेखण्यासंदर्भातील उपाययाेजनांवर विचारविनिमय करण्यात आला.
तत्पूर्वी संपूर्ण गावाचे सॅनिटायझेशन करण्यात आले. गावात सध्या काेराेनाचे २० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे संक्रमण राेखण्यासाठी ४५ पेक्षा अधिक वर्षे वयागेटातील नागरिकांचे अधिकाधिक लसीकरण करणे, नागरिकांच्या मनातील लसीकरणाबाबतचा संभ्रम दूर करणे, गावाचे वारंवार सॅनिटायझेशन करणे, रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांसाेबतच इतर नागरिकांनी विनाकारण घाबाहेर पडणे व फिरणे टाळणे, मास्कचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दी करणे व गर्दीत जाणे टाळणे यासह अन्य आवश्यक उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, पंचायत समितीचे माजी सभापती नरेश अरसडे, सरपंच दयाराम खंडारे यांच्यासह खंडविकास अधिकारी, प्राथमिक आराेग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आराेग्य विभागाचे कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.