रेवराल : काेराेना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माैदा शहरात नुकतेच आढावा बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात बैठकीत तालुक्यातील काेराेना संक्रमण, रुग्णांची संख्या, मृत्युदर, लसीकरण, राेखण्यासाठी केल्या जात असलेल्या व करावयाच्या उपाययाेजना, शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय साधनांची उपलब्ध व आवश्यकता यासह अन्य महत्त्वांच्या बाबींचा आढावा घेत त्यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार प्रशांत सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे, ठाणेदार हेमंत खराबे व अशोक कोळी, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चौरे, संदीप इटकेलवार, देवेंद्र गोडबोले, शुभम नवले, सदुकर हटवार, नितेश वांगे, नीता पोटफोडे, जितू साठवणे, रामपाल किरपान, दुर्गेश थोटे, मनोज गहरेवार उपस्थित हाेते. यावेळी काेराेनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययाेजनांवर चर्चा करण्यात आली. संंक्रमण राेखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे, लसीकरणाचा वेग वाढविण्याचे, त्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन खासदार कृपाल तुमाने यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आराेग्य केंद्रांना ऑक्सिजन काॅन्सेट्रेटर मशीन देण्यात आल्या. ग्रामीण रुग्णालयात सीटी स्कॅनची साेय करण्याचे तसेच वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.