शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवात रंगणार क्रांतिकारकांचे चरित्र

By admin | Published: January 11, 2016 2:56 AM

राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवात रंगणार क्रांतिकारकांचे चरित्र

कीर्तन महोत्सव आयोजन समिती : राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन नागपूर : cआयोजन मंगळवार १२ ते १७ जानेवारी दरम्यान चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कीर्तन महोत्सव परिसराला त्यांचे नाव देण्यात येणार आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे काढण्यात येणाऱ्या श्रीराम शोभायात्रेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने हा महोत्सव या शोभायात्रेला समर्पित करण्यात येणार असून महोत्सवात देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारकांचा जागर कीर्तनाच्या माध्यमातून होईल, अशी माहिती समितीचे संयोजक श्रीपाद रिसालदार आणि प्रेरक दिगंबरबुवा नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचा प्रारंभ १२ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, राम हरकरे, स्वामी प्रफुल्लजी, रामकृष्ण पोद्दार, आ. विकास कुंभारे यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता करण्यात येईल. यानंतर सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गीतरामायणचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी युवा कीर्तनकार संदीप मांडके ‘शहीद भगतसिंग’ विषयावर कीर्तन करतील. १४ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी सद्गुरुदास महाराज प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. १५ जानेवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार श्यामबुवा धुमकेकर यांचे ‘नरव्याघ्र तानाजी मालुसरे’ विषयावर कीर्तन होईल. १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय कीर्तनकार मानसी बडवे यांचे ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर’ विषयावर कीर्तन होईल. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. १७ जानेवारी रोजी ज्येष्ठ कीर्तनकार प्रा. न. चि. अप्पामार्जने यांचे ‘गुरु गोविंद सिंग’ यांच्यावर हिंदी भाषेत कीर्तन होणार आहे. याप्रसंगी जितेंद्रनाथ महाराज, नवनीतसिंग तुली, बलबीरसिंग रेणु, माधवदास ममतानी, रजवंतसिंग तुली उपस्थित राहणार आहे. (प्रतिनिधी)