शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

हैदराबादी तरुणांकडून नागपूरची रेकी

By admin | Published: December 27, 2015 3:13 AM

इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे स्वत:सोबत इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी‘ भेट देणार होते,

संवेदनशील स्थळांची पाहणी : इसिसच्या सूत्रधारांना देणार होते भेटनागपूर : इसिसच्या वाटेवर असलेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख हे तिघे स्वत:सोबत इसिसच्या सूत्रधारांना ‘नागपूरची रेकी‘ भेट देणार होते, अशी शंका घेणारा खळबळजनक घटनाक्रम प्राथमिक चौकशीतून उघड झाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागपूर ते श्रीनगर, तेथून पाकिस्तान आणि त्यानंतर सिरिया गाठण्याच्या तयारीत असलेल्या या तिघांनी सुमारे १३ तास नागपुरात घालवले. पकडले गेल्यानंतर त्यांनी नागपुरातील वास्तव्यादरम्यानचा घटनाक्रम उघड केला. तिघेही देत असलेली विसंगत अन् लपवाछपवी करणारी माहिती तपास यंत्रणांना अस्वस्थ करणारी ठरली आहे. हैदराबादहून गुरुवारी रात्री टॅक्सीने निघालेले अब्दुल बासित, सय्यद ओमर हुसेन आणि माज हसन फारूख शुक्रवारी दुपारी १.३० वाजता नागपुरात पोहचले. आल्याआल्याच त्यांनी सीताबर्डीत जेवण घेतले. नंतर किरकोळ खरेदी केल्यानंतर दुपारी ३ ते ६ दिलवाले हा चित्रपट बघितला. त्यानंतर शहरातील विविध भागात फिरून अनेक संवेदनशील स्थळांची पाहाणी केली. कपडे, सुकामेवा आणि अन्य काही चिजवस्तू खरेदी केल्या. रात्री ९ ते १२ असा पुन्हा एक इंग्रजी सिनेमा बघितला. त्यानंतर रेल्वेस्थानक गाठून जेवण वगैरे केल्यानंतर त्या परिसरात फेरफटका मारला. पूर्ण वेळ ते खासगी वाहनाने फिरत होते. पहाटे ३ सुमारास ते विमानतळावर पोहचले.तिघांचाही आॅनलाईन शोध नागपूर : तीन तरुणांचा शोध घेताना सुरक्षा यंत्रणांनी त्यांचे मोबाईल, फेसबुक, ई-मेल, व्हॉटस्अ‍ॅप तपासणे सुरू केले. या तिघांचेही मोबाईल स्वीच्ड आॅफ होते. मात्र, मोबाईल आॅफ करताना त्यांनी नागपूर विमानतळावरून विमानाचे श्रीनगरपर्यंत तीन तिकीट बुक केल्याचे उघड झाले. ते नागपूरहून इंडिगोच्या विमानाने इंदोर, दिल्लीमार्गे श्रीनगरला जाणार होते. सकाळी ८.१५ ला हे विमान नागपूर विमानतळावरून इंदोरकडे झेपावते. त्यामुळे पूर्वनियोजित योजनेनुसार हे तिघे पहाटे ३ च्या सुमारास विमानतळावर आले.परंतु तपास अधिकाऱ्यांना आॅनलाईन एअर बुकिंगचा महत्त्वपूर्ण धागा हाती लागल्याने त्यांना जेरबंद करता आले. पुन्हा त्यांची सिरियाची वाट रोखण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. (प्रतिनिधी)घरवापसीनंतरही मिशन सुरूचसधन परिवारातील सदस्य असलेले हे तिघेही उच्चशिक्षित आहेत. बासित बीटेक फायनलचा विद्यार्थी आहे. ओमर बीएससी मायक्रोलॉजी (फायनल) तर माज बीईचा विद्यार्थी आहे. मात्र, ते इसिसच्या पुरते प्रभावात आहेत. बासित आणि माज तसेच त्यांचे दोन साथीदार असे चौघे चार महिन्यांपूर्वीच सिरियात जाणार होते. पश्चिम बंगाल, पाकिस्तानमार्गे ते सिरियात जाण्याच्या तयारीत असताना कोलकाता विमानतळावर त्यांना पकडण्यात आले होते. घरवापसीनंतर हैदराबाद सीआयटीने त्यांचे समुपदेशन केले होते. चारपैकी दोघे मागे फिरले. मात्र, बासित आणि फारुख यांच्या डोक्यातून इसिसचे भूत काही उतरले नाही. त्यांनी ‘त्या दोघांचा’ नाद सोडून ओमरला आपल्या ‘मिशन इसिस‘मध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर घरच्यांना गुंगारा देऊन गुरुवारी सायंकाळी गायब झाले.मोबाईल रस्त्यात फेकलेइसिसचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे अत्यंत तल्लख बुद्धीचे बासित आणि माज आपल्या बुद्धीचा भलत्याच कामासाठी वापर करीत असल्याचे दुसऱ्यांदा उघड झाले आहे. मोबाईल ट्रॅकिंगवरून आपला माग काढला जाऊ शकतो, हे ध्यानात घेत त्यांनी आपले मोबाईल स्वीच्ड आॅफ करून रस्त्यात फेकून दिले. मात्र, तपास यंत्रणा आपल्या एक पाऊल पुढे आहे. हे त्यांना पकडले गेल्यानंतर लक्षात आले.श्रीनगरात ‘आका‘आपण श्रीनगरला पोहचल्यानंतर तेथे आपले भव्य स्वागत होणार होते. तेथून पुढची सर्व व्यवस्था ‘आका‘च करणार होते, असे या दोघांनी प्राथमिक चौकशीत सांगितल्याचीही माहिती आहे. श्रीनगरातील स्वागतकर्ते अन् ‘आका‘ अर्थातच इसिसचे सदस्य असल्याचा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी काढला आहे.