शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

संधिवात टाळता येऊ शकतो

By admin | Published: April 11, 2016 3:06 AM

ज्येष्ठांना नकोसा वाटणारा ‘संधिवात’ हा आजार नसून शरीरातील नैसर्गिक बदल आहे.

‘विदर्भ हृमेटोलॉजी अपडेट’ : विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटी व असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडियाचा उपक्रमनागपूर : ज्येष्ठांना नकोसा वाटणारा ‘संधिवात’ हा आजार नसून शरीरातील नैसर्गिक बदल आहे. कोणत्याही प्रकारे श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करणारा संधिवात कुणालाही जडू शकतो. संधिवात रोखता येऊ शकत नसला तरीही तो टाळता येऊ शकतो, नियंत्रणात आणू शकतो, फक्त त्यासाठी आवश्यकता आहे ती नियमित व्यायाम, शरीराचे वजन कमी ठेवणे आणि योग्य डॉक्टरांचा सल्ला, असा सूर ‘विदर्भ हृमेटोलॉजी अपडेट’ या विषयावर आयोजित निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) उपक्रमातून तज्ज्ञानी दिला.विदर्भ आॅर्थोपेडिक सोसायटी (व्हीओएस) आणि असोसिएशन आॅफ फिजिशियन आॅफ इंडिया (एपीआय) यांच्या संयुक्त विद्यमाने या सीएमईचे आयोजन करण्यात आले होते. यात हृमेटोलॉजिस्ट डॉ. निमिश नानावटी, डॉ. स्मृति रामटेके, डॉ. योजना गोखले, डॉ. जय देशमुख यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. स्मृति रामटेके यांनी अर्थरायटिसबाबत सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, सर्वसाधारणपणे सर्वांच्या सांध्यामध्ये गॅप असतेच या गॅपमध्ये एक संवेदना नसलेला पदार्थ असतो. परंतु, एकदा का हा पदार्थ निघून गेला की, त्यानंतर गुडघेदुखी सुरू होते. शरीरातील या नैसर्गिक बदलातूनच खऱ्या अर्थाने संधिवाताला सुरुवात होते. डॉ. निमिश नानावटी म्हणाले, या आजारावर उपचारपद्धती निवडतानाही प्रत्येक रुग्णाचा संधिवात किती प्रमाणात गंभीर आहे, जीवनपद्धती आणि आवडीनिवडी काय आहेत, या सगळ्यांचा विचार करायला हवा. यातील काही उपचारपद्धती रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करू शकतात. तसेच या रुग्णांनी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.डॉ. योजना गोखले यांनी पाठीचे दुखणे आणि स्पाँडिलोआर्थाेपॅथी डायग्नोसिस आणि त्यावरील व्यवस्थापन यावर प्रकाश टाकला. डॉ. जय देशमुख यांनी उपचार सुरू असताना येणाऱ्या समस्या आणि त्यांना कसे हाताळावे यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमला व्हीओएसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चौधरी, एपीआयचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, व्हीओएसचे सचिव डॉ. अलंकार रामटेके, एपीआयचे सचिव डॉ. शंकर खोब्रागडे उपस्थित होते. या सोबतच विविध विषयांवर विशेषज्ञांच्या वक्तव्याच्या दरम्यान अध्यक्ष म्हणून डॉ. आर. बी. कळमकार, डॉ. एस. डी. जवर, डॉ. पी. के. देशपांडे, डॉ. निर्मल जायसवाल, डॉ. आर. पी. मुंडले, डॉ. व्ही. एम. भालेराव, डॉ. यू. महाजन, डॉ. एस. सुब्रमणियम, डॉ. संजय जैन, डॉ. निखिल बांलखे, डॉ. सुधीर सोनी व डॉ. अनिल मसंद उपस्थित होते.(प्रतिनिधी)