शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

गरिबांच्या ‘आरटीई’त श्रीमंत पालक

By admin | Published: April 14, 2015 2:23 AM

सोमवारी दीक्षाभूमी स्थित बी.आर.ए.मुंडले शाळेच्या सभागृहात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ‘ड्रॉ’ काढण्यात आले.

प्रवेशाचे निघाले ‘ड्रॉ’ : चार दिवसांनी कळणार ‘एसएमएस’वर माहितीनागपूर : सोमवारी दीक्षाभूमी स्थित बी.आर.ए.मुंडले शाळेच्या सभागृहात ‘आरटीई’ प्रवेशप्रक्रियेअंतर्गत ‘ड्रॉ’ काढण्यात आले. नियमांनुसार वंचित व दुर्बल कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी ‘आरटीई’ची (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष ‘ड्रॉ’च्या वेळी आलेल्या अनेक पालकांकडे महागड्या दुचाक्या व ‘स्मार्टफोन’ दिसून येत येत होते. अशा स्थितीत ‘आरटीई’चे प्रवेश नेमके कुणासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित होत होता. शिक्षण विभागाकडून सकाळी ११ वाजता ‘आॅनलाईन’ प्रणालीने ‘ड्रॉ’ काढण्यात आला. ‘एनआयसी’ पुणे यांच्या ‘सॉफ्टवेअर’च्या मदतीने ही प्रक्रिया पार पाडली. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती उकेश चव्हाण, नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती चेतना टांक, प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी, आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ‘ड्रॉ’करता ४ ‘बाऊल’मध्ये ० ते ९ अशा १० चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. या चिठ्ठ्या बालकांकडून काढण्यात आल्या व त्यांची संगणकीय नोंद करण्यात आली. याचे ‘मॅट्रिक्स’ पूर्ण झाल्यानंतर ‘ड्रॉ’ अंतिम झाला. मुलांना नेमक्या कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे याची माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर कळविण्यात येईल असे यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.गरिबांच्या प्रक्रियेत सधन उमेदवार पाहून अगोदरच अनेक पालक संतप्त झाले होते. अशा स्थितीत माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर मिळणार असल्याचे कळताच पालकांचा पारा आणखी चढला व अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. या ‘ड्रॉ’ची माहिती इतक्या उशिरा का देण्यात येत आहे, माहिती सार्वजनिक का करण्यात येत नाही याबाबत विचारणा करण्यात आली. सर्व प्रक्रिया ‘आॅनलाईन’ असल्याने यात कुठलाही गोंधळ होणार नाही व पूर्णपणे पारदर्शकता राहील असे पालकांना समजावून सांगितले. येथे सधन पालक कसे काय आले याबाबत पालकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली असता याबाबत ठोस उत्तर कोणीही देऊ शकले नाही. पालकांना उत्पन्नाचे दाखले उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले. त्यांच्या दाखल्यांवर आक्षेप घेण्याचा आम्हाला अधिकार नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)