लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राची विजेची मागणी ९ हजार मेगावॅटने घटली आहे. बहुतांश मागणी घरगुती ग्राहकांकडून येत आहे. दरम्यान तापमान वाढताच विजेची मागणीही वाढली. विजेच्या मागणीत हळूहळू वाढ होऊ लागली. यादरम्यान ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ग्रीन झोन व इतर ठिकाणच्या महत्त्वाच्या उद्योगांना सुरू करण्याची मंजुरी मिळताच विजेची मागणी अचानक वाढली. २४ एप्रिल रोजीचा विचार केल्यास सकाळी १८,२२५ मेगावॅट विजेची मागणी होती ती दुपारी वाढून १८,६६४ मेगावॅटपर्यंत पोहोचली. रात्री १० वाजता ही मागणी कमी होऊन १६,५५४ मेगावॅटवर आली.बंद युनिटमधून उत्पादन शक्यविजेची मागणी सातत्याने कमी होत असल्यामुळे महावितरण पॉवर एक्सचेंजमध्ये उपलब्ध स्वस्त विजेने काम चालवित आहे. यामुळे महागडे उत्पादनाचे केंद्र बंद करण्यात आले आहे. यात कोराडी, नाशिक, परळी व भुसावळ या केंद्रांचा समावेश आहे. महावितरणच्या सूत्रानुसार मागणी याचप्रकारे वाढत राहिली तर बंद केंद्रातूनही वीज घेण्याचा विचार होऊ शकतो.कशी वाढली मागणीतारीख सकाळ दुपार सायंकाळ१९ एप्रिल १४,५०० १३,००० १३,०००२२ एप्रिल १५,६८० १५,४४० १४,७८०२४ एप्रिल १८,२२५ १८६६४ १६५५४नोट : मागणी मेगावॅट मध्ये
लॉकडाऊनमध्ये वाढत आहे विजेची मागणी : उद्योग सुरू झाल्याचा परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 12:26 AM