प्रश्न : तुमच्या मते ‘रिस्क गव्हर्नन्स’ म्हणजे काय?
उत्तर : ‘रिस्क गव्हर्नन्स’ हे जोखीम व्यवस्थापन उपक्रम आणि संघटनात्मक यंत्रणेत जोखीम व निर्णय व्यवस्थापनासंदर्भात ठरवली जाणारी धोरणे, प्रक्रिया व पद्धत यांचे नियंत्रण करणारे पायाभूत कार्य आहे. देशातील नेते या बाबी निश्चित करतात व संबंधित भागीदार त्यानुसार पुढील वाटचाल करतात.
***
प्रश्न : अमेरिका व भारतातील साथरोग नियंत्रण उपाययोजनेत त्रुटी होत्या, असे तुम्हाला वाटते का?
उत्तर : निश्चितच, दोन्ही देशांमध्ये आणखी बरेच काही चांगले करता आले असते. कोरोनाच्या धोक्याची माहिती न दिल्यामुळे नागरिक आता आरोप करीत आहेत. नागरिकांना अशा गंभीर बाबींची माहिती न दिल्यास असे घडू शकते.
***
प्रश्न : भविष्यात साथरोगाचा धोका ओळखला जाऊ शकतो का?
उत्तर : साथरोगाचा धोका प्राथमिक टप्प्यावरच ओळखणे सुरू होते. साथरोग फोफावणार हे ओळखले व स्पष्ट केले पाहिजे. साथरोग प्रसाराचे माध्यम व अनुवांशिक प्रक्रिया तपासण्यासाठी साथरोगाचा स्ट्रेन ओळखला पाहिजे. आजाराची गंभीरता व धोका यांची वर्गवारी केली पाहिजे. आजार व त्याच्या अंतिम बिंदूचे स्पष्टपणे वर्णन केले गेले पाहिजे. तसेच, संबंधित आजार किती क्षमतेने वाढू शकतो, याचेही आकलन या टप्प्यात झाले पाहिजे.
***
प्रश्न : उपाययोजना केल्या, पण त्यास विलंब झाला का?
उत्तर : होय, त्यानंतर धोक्याच्या आकलनाचा मुद्दा होता. धोक्याचे आकलन हा धोका ओळखण्याचा वैयक्तिक भाग आहे. धोक्याला कमी लेखणे व त्याविषयी खूप जास्त भीती बाळगणे या गोष्टी अपेक्षांवर अवलंबून असतात. धोका ओळखण्याच्या प्रक्रियेदरम्यान या बाबी महत्त्वाच्या आहेत.
***
प्रश्न : कोरोनाची तापाशी तुलना करणे चुकीचे होते का?
उत्तर : हा धोका ओळखण्याचा मुद्दा आहे. कोरोना विषाणू नवीन होता. जानेवारी-२०२० मध्ये तो आजार आहे की नाही, हे कुणालाच माहीत नव्हते. परंतु, हा तापासारखा आजार आहे. त्याची लक्षणे तापासारखीच आहेत. त्यामुळे तो तापच असावा, असा समज झाला. ही आपली वैयक्तिक भूमिका होती. असे निर्णय नेहमीच चुकीचे असतात. पूर्वग्रहाशिवाय निर्णय घेणे आणि जोखीम व्यवस्थापन करणे कठीण असते.
***
प्रश्न : जोखीमविषयी निर्णय घेण्यात वैयक्तिक पैलू असतात का?
उत्तर : निश्चितच असतात. जोखीमपूर्ण निर्णय हे पूर्वग्रहापासून व गैरसमजापासून मुक्तीविषयी असतात. तो जोखीम ओळखण्याचा आधार असतो.
***
प्रश्न : तुमच्या पुस्तकातील मॉडेल किती अचूक आहे?
उत्तर : पुस्तकातील मॉडेल इंग्लंडकरिता थोडे अचूक आहे, परंतु, मॉडेलचे महत्त्व त्यातील माहितीसारखेच आहे. माझ्या मॉडेलनुसार विषाणूचा प्रसार ही गंभीर बाब होती. मॉन्टे कार्लो विश्लेषणानुसार, माहितीच्या उपलब्धतेनुसार मॉडेलमध्ये नियमित बदल केले पाहिजे. तसेच, एका प्रसिद्ध अभ्यासकानुसार, सर्व मॉडेल्स चुकीचे असतात, पण त्यातील काही उपयोगी असतात.
***
प्रश्न : जोखीम लवचिकता म्हणजे काय?
उत्तर : लवचिकता विशिष्ट कार्याला, स्रोतपूर्णतेला व नवीन गोष्टी स्वीकारण्याला बळकटी प्रदान करते. आणखी सखोल सांगायचे झाल्यास, तणावातील यंत्रणा निर्णय घेताना चुका करते. योग्य निर्णय संघटनात्मक व एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन घेतले जातात. पूर्वग्रहापासून बाहेर येणे, परिस्थिती समजून घेणे व परिणामांचा विचार करणे, हे निर्णय घेणाऱ्यावर अवलंबून असते.
***
प्रश्न : हे सर्व लवचिक होण्याविषयी आहे का?
उत्तर : होय, जोखीम प्रतिसादाचे मॉडेल करणे हे बदलणाऱ्या जोखीमवर अवलंबून आहे. यंत्रणा अभियंते कोरोनाला सामान्य समस्या मानतात. आपल्याला जोखीम प्रतिसादामध्ये विविधता ठेवण्यासाठी लवचिक राहणे आवश्यक आहे.
***
प्रश्न : जोखीम लवचिकता कशी वाढवता येईल?
उत्तर : प्रथम, जोखीम बुद्धिमत्ता अनपेक्षित जोखीमचे व्यवस्थापन करते. जोखीम ओळखण्यासाठी अचूक माहिती मिळविणे आवश्यक असते. जोखीम व्यवस्थापन त्यावर अवलंबून असते. त्यातून जोखीम परतवून लावण्यासाठी अचूक व्यवस्थापन करता येते.