शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्या रितिका मालू यांना तात्पुरता जामीन नाहीच

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 28, 2024 2:32 PM

हायकोर्टाचा दणका : पुणेतील पार्शे कारसारखा भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशभर गाजत असलेल्या पुणेतील पार्शे कारसारखा भीषण अपघात करणाऱ्या नागपूरच्या ३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू यांची तात्पुरता अटकपूर्व जामीन देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अमान्य केली. त्यामुळे मालू यांना जोरदार दणका बसला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होत्या. दरम्यान, त्यांची कार अनियंत्रित होऊन आधी रामझुल्याच्या कठड्याला धडकली व त्यानंतर कारने मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) हे दोन तरुण मित्र स्वार असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दोन्ही तरुण दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते. त्यांना या क्षेत्रात खूप पुढे जायचे होते. परंतु, रितिकाच्या नशेने त्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले. 

तहसील पोलिसांनी रितिकाविरूद्ध भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), (निष्काळजीपणाने २७९ वाहन चालविणे), ३३६ (मानवी जीव धोक्यात टाकणारी कृती करणे), ३३८ (गंभीर जखमी करणे), ४२७ (आर्थिक नुकसान करणे) आणि मोटर वाहन कायद्यातील कलम १८४ (भरधाव वेगात वाहन चालविणे) व १८५ (दारूच्या नशेत वाहन चालविणे) या गुन्ह्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. रितिकाने सुरुवातीला सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून अटकपूर्व जामीन मागितला होता. तो अर्ज २४ मे रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणावर आता 13 जून रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. यादरम्यान, राज्य सरकारला जामिनावर उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर