लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर/उमरेड/कळमेश्वर/हिंगणा/केळवद/धामणा/बडेगाव : नागपूर जिल्ह्यात सुरू असलेला संततधार पावसाचा जाेर दुसऱ्या दिवशीही कायम हाेता. गुरुवारी (दि. २१) सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर काेसळलेल्या पावसामुळे सावनेर तालुक्यातील काेलार, बेला (ता. उमरेड) परिसरातील नांद नदीसह नाल्यांना पूर आल्याने पुलावरून पाणी वाहात हाेते. त्यामुळे काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. पुरामुळे सावनेर व कळमेश्वर शहरात पावसाचे पाणी तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली हाेती. जिल्ह्यात पाऊस अथवा वीज काेसळून प्राणहानी झाली नाही.
सावनेर शहरात चहुकडे पाणी
सावनेर शहरासह परिसरात बुधवार सकाळपासून पावसाचा जाेर कायम हाेता. संततधार पावसामुळे बुधवारी फारसा फरक जाणवला नाही. मात्र, गुरुवारी शहरालगत वाहणाऱ्या काेलार नदीला पूर आल्याने शहरातील पावसाचे पाणी वाहून जाण्याचा वेग मंदावल्याने शहरातील बस स्थानक चाैक, महात्मा गांधी चाैक, छिंदवाडा रोड, महाजन ले-आऊट, प्रोफेसर कॉलनी, गणेश नगर, चिंचपुरा, पहलेपार, झेंडा चौक या भागात पावसाचे पाणी साचल्याने हा परिसरात चहुकडे पाणीच पाणी दिसत हाेते. शहरालगतच्या सावनेर-कळमेश्वर मार्गावरील काेलार नदीच्या पुलासाेबतच शहरातील मिनी पुलावरून पुराचे पाणी वाहात हाेते. नगर परिषद प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत शहरातील काेलार नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचनाही दिल्या हाेत्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस व पुराचा जाेर कायम हाेता.
...
हिंगणा-कान्होलीबारा मार्गावरील वाहतूक ठप्प
संततधार पावसामुळे हिंगणा तालुक्यातील नाल्यांना पूर आला हाेता. हिंगणा-कान्होलीबारा मार्गावरील नाल्याला पूर आल्याने तसेच पुराचे पाणी पुलावरून वाहात असल्याने या मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली हाेती. साेबतच महादेव व पिंपळधरा गावालगतच्या नाल्यावरील पुलांवरून पुराचे पाणी वाहात हाेते. हिंगणा-कान्होलीबारा हा राज्य मार्ग असल्याने या नाल्यावरील पुलावरून नेहमीच पुराचे पाणी वाहते. त्यामुळे येथे उंच पूल बांधणे गरजेचे आहे. पूर ओलांडताना गुरे वाहून केल्याची माहिती नागरिकांनी दिली. मात्र, कुठे आणि कुणाची किती गुरे वाहून गेली, याची तालुका प्रशासनालाही रात्री उशिरापर्यंत माहिती नव्हती.
...