नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन जवळ सुरु असलेल्या आरओबीचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. येथील काम आता दीड महिन्यात होणार असल्याचे सांगितले जाते. या कामासाठी कंत्राटदार कंपनीला आधीच दीड महिन्याचे एक्सटेंशन मिळाले होते, हे विशेष.
या प्रकल्पाचे काम मार्च २०१९ मध्ये पूर्ण होणार हाेते. परंतु केवळ ५५ मीटरच्या भागात गर्डर उभा करणे व त्यात काँक्रीट भरण्यासाठीच कंत्राटदार कंपनीला दाेन वर्ष लागली. या कंपनीने २०१७ मध्ये कामाला सुरुवात केली होती. यानंतर नाल्याचे काम, रस्त्याचे, एप्रान, सर्व्हिस रोड आणि खांब लावणे आदी प्रत्येक काम अतिशय संथ गतीने झाले. इतक्या निष्काळजीपणानंतरही कंपनीलाा एक्सटेंशन देण्यात आले. आता हे काम दीड महिन्यात पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे.
एप्रिल २०१७ पासून सुरु झालेल्या आरओबीच्या बांधकामात डिझाईनवरून वाद होता. अनेक प्रकाारचे डिझााईन सादर केल्यानंतर शेवटी सरळ ट्रॅकच्या आरपार दोन पीलरवर एक गर्डर असलेली डिझाईन मंजूर करण्यात आले. यानंतर रेल्वेकडून ब्लॉक मिळण्यासाठीही बराच वेळ लागला. स्टील गर्डर येण्यासाठीही वेळ गेला. गर्डरच्या मजबुतीसाठी थर्ड पार्टी म्हणून सीईआयएलकडून ऑडिट करण्यात आले. यानंतर लॉकडाऊन, मजुरांची कमतरता, पाऊस यामुळेही काम रखडत गेले. पुलाच्या दोन्ही बाजुला जुन्या आरओबीवर डांबरीकरण झालेले आहे.
बॉक्स
रेल्वेच्या मंजुरीनंतर सुरू झाले काम
आरओबीच्या स्टील गर्डरवाल्या बाजूच्या मजबुतीबाबत रेल्वेला शंका होती. त्यामुळे व्हीएनआयटीकडून टेस्ट करून रिपोर्ट तयार करण्यात आला. दोन वेळा ऑडिट केल्यानंतर अलीकडेच मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात केली जात आहे.
कोट
दीड महिन्यानंतर वाहतूक सुरु होईल
रेल्वेकडून मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे. दीड महिन्यानंतर येथून प्रत्यक्ष वाहतुकीला सुरुवात होईल.
अभिजित जिचकार, प्रोजेक्ट डायरेक्टर, एनएचएआय