लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.आतिश भोसले (२६), शशिकपूर भोसले (२१), दिनेश राज चव्हाण (२२), गुलाबचंद भोसले (२३) व रवी भोसले (२८), अशी आरोपींची नावे असून, आतिश व शशिकपूर हे चांपा तर, अन्य आरोपी हरदा ( मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत. ही घटना १९ जानेवारी २०१३ रोजी घडली होती. आरोपींनी चांपा येथील शेतात राहणाऱ्या एका कुटुंबावर सशस्त्र हल्ला केला होता. दरम्यान, त्यांनी महिला, पुरुष व मुलामुलींना जबर मारहाण करून घरातील सामान लुटले. तसेच, १८ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी इतर घरांत दरोडा टाकून लोकांना जखमी केले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर कुही पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपींना अटक केली होती. तसेच, तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.
चांपामधील दरोडा व बलात्कार प्रकरण : पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:52 PM
सत्र न्यायालयाने कुहीजवळच्या चांपा येथील दरोडा व बलात्कार प्रकरणातील पाच आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी २६ हजार रुपये दंड, अशी कमाल शिक्षा सुनावली आहे.
ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालय