लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बालाजी हाईट्स सोसायटीमध्ये दोघांनी २३ लाख ४५ हजार रुपयांची अफरातफर केली. सोसायटीची रक्कम हडप करण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर दोघांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रज्योत मधुकर केशेट्टीवार (वय ४७) आणि अतुल केशव पराई (वय ४८) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी केशेट्टीवार आणि पराई या दोघांनी बालाजी हाईट्समधील मुदत ठेवीची रक्कम २२ लाख ७० हजार तसेच किर्द बुकातील नोंदीप्रमाणे १० लाख ७५ हजार अशी एकूण ३३ लाख ४५ हजार रुपयांची रक्कम उचलली. मात्र त्यातील फक्त १० लाख रुपयांचाच भरणा त्यांनी सोसायटीत केला. उर्वरित २३ लाख ४५ हजारांच्या रकमेचा त्यांनी अपहार केला. ९ सप्टेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत हा गैरव्यवहार घडला. तो उघडकीस आल्यानंतर मोहन भीमराव पाटील (वय ४८, रा. नरेंद्रनगर) यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केली आणि शुक्रवारी केशेट्टीवार तसेच पराई या दोघांविरुद्ध विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.एकाला अटक, दुसऱ्याचा शोध सुरूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी प्रज्योत केशेट्टीवार याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अतुल पराई याचा शोध घेतला जात आहे.
नागपुरातील बालाजी हाईट्स सोसायटीत अफरातफर : २३ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 8:01 PM
प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बालाजी हाईट्स सोसायटीमध्ये दोघांनी २३ लाख ४५ हजार रुपयांची अफरातफर केली. सोसायटीची रक्कम हडप करण्यात आल्याची तक्रार मिळाल्यानंतर दोघांविरुद्ध प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हा दाखल