शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील दरोड्याचा छडा

By admin | Published: August 21, 2015 3:30 AM

हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील गार्डला गंभीर जखमी करून एक लाख रुपये लुटून नेणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले.

सहा आरोपी गजाआड : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरीनागपूर : हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील गार्डला गंभीर जखमी करून एक लाख रुपये लुटून नेणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले. या दरोड्यातील सात पैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कार तसेच मोबाईलसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली. पेट्रोल पंपावर संजय भाऊराव गजभिये (वय ५०, रा. रा. स्वामीधाम इसेंन्सी, घोगली) हे बेसा, बेलतरोडी मार्गावरील इंडियन आॅईल पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. ३ आॅगस्टच्या पहाटे २.३० ते २.४५ च्या सुमारास लुटारू आले आणि त्यांनी गजभियेंना मारहाण करून कार्यालयातील एक लाख रुपयांची रोकड लुटून नेली. गुन्हेशाखेच्या पोलिसांना या दरोड्यात स्विफ्ट कार वापरल्याची माहिती कळाली. तो धागा धरून पोलिसांनी तपास केला. कारमालकाने घटनेच्या काही तासांपूर्वी सेंटर पॉर्इंट हॉटेलसमोरून ही कार चोरी गेल्याची माहिती दिली. पूर्वनियोजित कटानुसार आरोपी शानू शुक्ला हॉटेल सेंटर पॉर्इंटसमोर उभा होता. कारमालक (एमएच ३१/ सीके २२४३) येताच समोर जाऊन शानूने त्याला सॅल्यूट केला आणि आपण हॉटेलचे कर्मचारी आहोत, पार्किंगमध्ये कार लावतो, असे सांगत कारमालकाकडून चावी घेतली. पोलिसांनी त्याआधारे तपास करून आरोपींचे धागेदोरे जुळविले. त्यानंतर शानू जयनारायण शुक्ला (वय २३, रा. बजरंगनगर), अखिल प्रकाश वांडरे (वय २१, रा. रमजीवीनगर) निखील अरविंद गिरी (वय २४, रा. गंगानगर), अक्षय लक्ष्मणराव अबलनकर (वय २०, रा. रामेश्वरी), विक्की ऊर्फ रिंक्या राजू खोंडे (वय २१, रा. कुकडे ले आऊट), प्रशांत दिनेश तामने (वय २१, रा. कैलास नगर) यांना अटक केली. या दरोड्याची टीप राजू नामक व्यक्तीकडून आरोपींना मिळाली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचेही तरवडे यांनी सांगितले. यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त (डिटेक्शन) रंजन शर्मा आणि उपायुक्त (ईओडब्ल्यू) तसेच एसीपी नीलेश राऊत यांनीही या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात वेगवेगळी माहिती दिली. (प्रतिनिधी)चोरीच्या रकमेतून घेतली कारआरोपींनी रोकड लुटल्यानंतर त्यातून एक जुनी सेलो कार विकत घेतली. या कारने गुन्हे करण्याची त्यांची योजना होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. प्रशांत तामने हा वगळता सर्व आरोपी मध्य प्रदेशात लपून बसले होते. पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, एपीआय प्रशांत चौगुले, हवालदार सुखदेव मडावी, महादेव सातपुते, राजू डांगे, मिलिंद मून, संजय देवकर, नायक संदीप गवळी, जयंत सेलोटे, गोपाल देशमुख, सतीश निमजे, रामकैलास यादव आणि रवी राऊत यांनी तेथे जाऊन आरोपींना अटक करण्याची कामगिरी बजावली.