आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा
नागपूर : देशाला तिसऱ्या महासत्तेपर्यंत पोहोचविणारे जी थोर मंडळी आहेत, ती सर्व ग्रामीण भागातून आलेली आहे. त्यांच्या गावातील शिक्षकांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आहे. देश घडविण्यात मोठे योगदान हे ग्रामीण भागातील शिक्षकांचे आहे. त्यामुळे शिक्षकांचे काम कुठल्याही स्केलपट्टीने मोजता येणार नाही, त्यांचे कार्य महान असल्याची भावना राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्यावतीन दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. कार्यक्रमाला जि.प.च्या अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक
सुजाता भानसे, जितेंद्र धुर्वे, विजय किरपाल, महेंद्र मेश्राम, नीलिमा राऊत, शेषराव टाकळखेड, उत्तम मनकवडे, चिंतामण ताजने, संजय ढोके, रणजित बागडे, येशीराम राऊत, वसुंंधरा किटकुले (धोटे), संजय दुर्गे, संगीता चाके, डॉ. यमुना नाखले.