शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

रूपकिशोर यांनी जपलाय ऑलिम्पिकचा ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 4:07 AM

मंगेश व्यवहारे नागपूर : अख्ख्या क्रीडा जगताचे लक्ष सध्या टोकियो ऑलिम्पिककडे लागले असताना, नागपुरातील महाल भागात राहणाऱ्या रूपकिशोर कनोजिया ...

मंगेश व्यवहारे

नागपूर : अख्ख्या क्रीडा जगताचे लक्ष सध्या टोकियो ऑलिम्पिककडे लागले असताना, नागपुरातील महाल भागात राहणाऱ्या रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे असलेला ऑलिम्पिकशी संबंधित संग्रह लक्ष वेधून घेतोय. ऑलिम्पिकशी संदर्भातील नाणी, डाक तिकिटा, फर्स्ट डे कव्हर त्यांच्या छोट्याशा झोपडीला मौल्यवान बनवितो. याशिवाय त्यांच्याकडे ऑलिम्पिकशी संदर्भातील घटना, आठवणींचा ठेवा त्यांच्या या संग्रहीवृत्तीला आणखी रोचक बनवितो.

६० वर्षीय रूपकिशोर कनोजिया हे नागपुरातील प्रसिद्ध संग्राहक म्हणून परिचित आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे. त्यांच्या या संग्रहात ऑलिम्पिकदेखील हा एक विषय आहे. ऑलिम्पिकची सुरुवात १८९६ मध्ये झाली. पण रूपकिशोर यांच्या संग्रहात १९४८ च्या लंडन ऑलिम्पिकपासून डाक तिकिटांचा संग्रह आहे. ऑलिम्पिकचे आयोजन करणाऱ्या देशाने त्या त्या वेळी काढलेल्या ऑलिम्पिकच्या डाक तिकीट त्यात आहेत. लंडनमध्ये २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक दरम्यान २९ खेळांवर काढलेली नाणी रूपकिशोर यांच्याकडे आहेत. ब्राझिलमध्ये २०१६ ला झालेल्या रिओ ऑलिम्पिकदरम्यान ब्राझिल देशाने काढलेल्या १६ नाण्यांनाही त्यांनी आपल्या संग्रहात ठेवले आहे. भारतीय पोस्ट खात्यानेसुद्धा १९७२ पासून ऑलिम्पिकवर काढलेले फर्स्ट डे कव्हरसुद्धा त्यांनी संग्रही ठेवले आहे. हा संग्रह त्यांनी आपल्या झोपडीत जतन करून ठेवला आहे. या संग्रहासाठी त्यांना ऑल इंडिया कॉम्पेटेटिव्ह न्यूमॅस्टिक एक्झिबिशनमध्ये सन्मानितदेखील करण्यात आले आहे.

ही आहेत त्यांच्या संग्रहातील वैशिष्ट्ये

१) १९४८, १९६४, १९७६, १९८४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या डाक तिकीटा.

२) २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये २९ खेळांवर प्रसिद्ध केलेली नाणी.

३) २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राझिल देशाने काढलेल्या १६ नाणी.

४) १९७२, २००८, २०१२, २०१६ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकशी संदर्भात भारतीय डाक विभागाने काढलेले फर्स्ट डे कव्हर.

त्यांच्या मुखोद्गत असलेल्या रोचक आठवणी

इतकेच नाही तर ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली. सर्वाधिक ऑलिम्पिकचे आयोजन कुठल्या देशाने केले. आशिया खंडात कितीवेळा ऑलिम्पिक झाले. १९१६, १९४०, १९४४ साली ऑलिम्पिक का झाले नाही. १९३६ च्या ऑलिम्पिकमध्ये हिटलरने मेजर ध्यानचंदबद्दल व्यक्त केलेले कौतुकोद्गार, भारताने मिळविलेले पहिले पदक, पहिल्या भारतीय महिला खेळाडूंनी मिळविलेले पदक, आतापर्यंत भारताची पदतालिका असे अनेक किस्से, गोष्टी, रोचक आठवणी त्यांना मुखोद्गत आहेत.

- विविध वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असल्याने, त्या माध्यमातून ऑलिम्पिकशी निगडित साहित्यसुद्धा मिळाले. खेळात रुची असल्याने ऑलिम्पिकची दुर्मिळ माहिती गोळा करीत होतो. त्यातून ऑलिम्पिकशी संबंधित संग्रह निर्माण झाला. हा दुर्लभ खजाना आपल्याजवळ असल्याचा आनंद आहे.

-रूपकिशोर कनोजिया, संग्राहक

रूपकिशोर करायचे धोबी काम

रूपकिशोर हे सुरूवातीला मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर त्यांनी सूतिकागृहात धोबी म्हणून काम केले. पण त्यांना संग्रहाची आवड होती. ती त्यांनी कामातही कायम ठेवली. आज ते ६० वर्षांचे आहेत. त्यांची ही संग्राहक वृत्ती त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही.