६४ वर्षांआधीची पोस्टाची तिकिटे : जगभरातील संग्रह मंगेश व्यवहारे नागपूर ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकचा ज्वर जगभरात चढला आहे. भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. आॅलिम्पिकच्या महाकुंभात नागपूरचा एका क्रीडाप्रेमीही चर्चेत आला आहे. मुळात छंदिष्ट असलेल्या क्रीडाप्रेमीजवळ जगात आतापर्यंत झालेल्या आॅलिम्पिकचा दुर्मीळ ठेवा संग्रही आहे. त्याच्या संग्रहात १९४८ पासून २०१२ पर्यंत झालेल्या आॅलिम्पिकदरम्यान त्या-त्या देशाने काढलेल्या पोस्टाच्या तिकिटांचा आहे. त्याचबरोबर २०१२ मध्ये लंडन आॅलिम्पिकच्या वेळी ब्रिटिश सरकारने काढलेल्या २९ खेळांवरील नाणी आहेत. रूपकिशोर कनोजिया नावाचा हा संग्राहक कुश्तीपटू होता. सध्या तो महालातील सूतिकागृहात धोबीचे काम करतो. लहानशा झोपडीत राहून संग्रहाची आवड जोपासतो आहे. सचिन तेंडुलकरबद्दल त्याला विशेष आकर्षण असून, सचिनने खेळलेल्या २०० टेस्ट मॅचेसचे फस्ट डे कव्हर त्याच्याकडे आहे. त्याचबरोबर २०० देण्याचे नाणे, १०० देशाचे नोट आणि ५ हजारावर स्टॅम्प तिकीट आहे. त्याच्या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या लंडन आॅलिम्पिकमधील २९ नाणे. २०१२ मध्ये लंडन तिसऱ्यांदा आयोजक ठरल्याने, आॅलिम्पिकमध्ये समाविष्ट २९ प्रमुख खेळांवर ब्रिटिश सरकारने नाणे काढले होते. हे २९ नाणे रूपकिशोर यांनी संग्रही केले आहे. या नाण्यावर प्रत्येक खेळाचे चित्र साकारले आहे. आॅलिम्पिकचा हा ठेवा दुर्मीळ आहे. अनेकांना त्याची माहितीसुद्धा नाही. माझ्याकडे असलेल्या संग्रहातून ही माहिती लोकांपुढे पोहचावी, एवढीच अपेक्षा आहे. २०१६ च्या रिओ आॅलिम्पिककडेही माझे लक्ष आहे. मी प्रत्यक्षात जाऊ शकत नसलो तरी, आॅलिम्पिकच्या काही नाविन्यपूर्ण गोष्टी गोळा करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. रूपकिशोर कनोजिया, संग्राहक
रूपकिशोरने जपला आॅलिम्पिकचा ठेवा
By admin | Published: August 03, 2016 2:34 AM