शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मेट्रो रेल्वेचा मार्ग बदलला

By admin | Published: May 08, 2016 3:04 AM

मेट्रो रेल्वेने जुना मार्ग आता बदलला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे धावणारी रेल्वे ...

अजनी स्टेशनमार्गे अजनी चौक : विकास आराखड्यानुसार रस्ता तयार होणारनागपूर : मेट्रो रेल्वेने जुना मार्ग आता बदलला आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी चौकाकडे धावणारी रेल्वे आता काँग्रेसनगर चौकातून अजनी स्टेशनमार्गे मेडिकल क्वॉर्टर व कारागृह परिसरातून अजनी चौकात नियोजित उड्डाण पुलाला जोडली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मार्ग बदलाची मागणी केल्यानंतर विकास कामांना वेग आला आहे. विकास आराखड्यानुसार या मार्गावर कारागृह परिसरातून अजनी चौकाला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम मनपा करणार आहे, तर त्याचवेळी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसी) पीलर उभारणार आहे. काँग्रेसनगर चौक ते रहाटे कॉलनी चौकापर्यंतचा रस्ता अरुंद असल्यामुळे या मार्गावरून मेट्रो रेल्वे नेणे तसे कठीणच होते. नवीन मार्गामुळे बांधकाम वेगात आणि सोईचे राहील, अशी माहिती एनएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)जुन्या रस्त्यावरून मेट्रो नेण्यास विरोधकाँग्रेसनगर चौक ते रहाटे कॉलनी चौक या मार्गावर न्यू इंग्लिश स्कूल, न्यायवैद्यक प्रयोगशाळा, होमगार्ड कार्यालय आणि रामकृष्ण मिशन आहे. या मार्गावरून मेट्रो नेण्यासाठी कार्यालये आणि येथील रहिवाशांचा कायमच विरोध होता. नवीन रस्त्याच्या निर्मितीसंदर्भात तीन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली. विकास आराखड्यांतर्गत कारागृहाच्या परिसरातून रस्ता बांधण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. या नवीन बदलांमुळे त्यामुळे काँग्रेसनगर चौकातून थेट अजनी चौकात तयार होणाऱ्या उड्डाण पुलापर्यंत वचौकापर्यंत मेट्रो रेल्वे सहजरीत्या नेणे शक्य होईल. या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) डॉ. भूषण कुमार उपाध्याय, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे निर्देशमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी रस्त्याचे बांधकाम करण्याचे निर्देश एनएमआरसीएल आणि मनपाला दिल्याची माहिती आहे. सध्या अजनी रेल्वे स्टेशन मेट्रो रेल्वेपासून ४०० मीटर लांब आहे. नवीन आराखड्यानुसार तयार होणार रस्ता मेट्रोशी जुळणार आहे. मनपा आणि एनएमआरसीएल संयुक्तरीत्या मेट्रो रेल्वेसाठी पीलर आणि रस्त्याचे बांधकाम करणार आहे.