शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

आरपीएफची कारवाई : रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:46 PM

रेल्वेचे लोखंड चोरी करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेले ३४ हजार ५०० रुपयांचे लोखंड जप्त करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे३४ हजाराचे लोखंड केले जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेचे लोखंड चोरी करणाऱ्या चार आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. त्यांनी चोरी केलेले ३४ हजार ५०० रुपयांचे लोखंड जप्त करण्यात आले आहे.रेल्वे सुरक्षा दलाचा जवान भूपेंद्र बाथरी १९ सप्टेंबरला दुपारी १.२५ वाजता ड्युटीवर होता. त्याने नवीन कुमार या जवानाला रेल्वेचे लोखंड चोरी झाल्याबाबत सूचना दिली. त्यानुसार नवलसिंह दाबेराव, अनिल उसेंडी, राजेश गडपलवार यांनी आरोपी शिवा हल्कीप्रसाद समसेरीया (३६) रा. हंसराज कोचे नमो बुद्धविहाराजवळ, इंदोरा, रिपब्लिकननगर, मुख्तार खुर्शीद अंसारी (६५) रा. ५७, बुद्धविहाराजवळ, योगी अरविंदनगर, शिवाजी चौक यांना ई रिक्षा क्रमांक एम. एच. ४९, ए. आर-२४१२ मध्ये रेल्वेचे ७० किलो लोखंड नेताना पकडले. त्यांनी आरोपीला मोक्षधाम येथील लोखंड विकलेल्या दुकानावर नेले असता तेथे रेल्वेचे चोरी केलेले लोखंड आढळले. त्यानंतर रेल्वेचे लोखंड खरेदी करणाऱ्या प्रशांत वासुदेव ढाकणे (५०) यास अटक करण्यात आली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवी जेम्स, उपनिरीक्षक होतीलाल मीना आणि जवानांनी पार पाडली.

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी