शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

आरपीएफचे 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' १० महिन्यात ९५८ मुले पोहचली कुटुंबियांत

By नरेश डोंगरे | Published: February 08, 2024 8:23 PM

रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले.

नागपूर : रेल्वेची मालमत्ता आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या १० महिन्यात ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत ९५८ मुलांचे भवितव्य सुरक्षित करून त्यांना त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचवले. आरपीएफकडे मुख्यत्वे रेल्वेची मालमत्ता सुरक्षित राखण्याची आणि रेल्वे प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी असते. हे करतानाच आरपीएफ वेगवेगळ्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडते. प्रसंगी जीव धोक्यात घालून रेल्वे प्रवाशांचे जीवही वाचविते.

शिवाय वेगवेगळ्या कारणामुळे घर सोडून निघालेल्या अल्पवयीन मुलांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांमध्ये पोहचविण्याचे कामही आरपीएफचे जवान करतात. अनेकदा कुणी आमिष दाखवून तर कुणी फूस लावून अल्पवयीन मुला-मुलींना पळवून नेतात. काही जण रागाच्या भरात घर सोडतात तर काही जण मनासारखे जगण्याच्या हेतूने घरापासून दूर पळून स्वत:चे भवितव्य अंधारात झोकण्याचा धोका पत्करतात. अशा सर्व अल्पवयीन मुला-मुलींना अलगद हेरून आरपीएफ त्यांना ताब्यात घेते आणि चाईल्ड लाईनच्या मदतीने त्यांचे योग्य समुपदेशन करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांमध्ये पोहचविते.

एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या १० महिन्यांच्या कालावधीत अशाच प्रकारे आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाच विभागातील एकूण ९५८ मुलांना ताब्यात घेतले आणि त्यांना त्यांच्या घरी पोहचवून त्यांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित केले आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा दिला. या महत्वपूर्ण कामगिरीत आरपीएफला रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि फ्रंट लाईन रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मदत केली.मुलांची संख्या दुप्पटपेक्षा जास्त

विशषे म्हणजे, आरपीएफने अवघ्या एका महिन्यात अर्थात जानेवारी २०२४ मध्ये ५६ मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे. घरून पळून जाणाऱ्यांमध्ये मुलांची संख्या अधिक आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या ९५८ मुला-मुलींमध्ये ६५५ मुले तर ३०३ मुलींचा समावेश आहे.

विभागनिहाय ताब्यात घेण्यात आलेली मुले

मुंबई विभाग : १७५ मुले, ११४ मुली, एकूण २८९नागपूर विभाग : ७६ मुले, ५६ मुली, एकूण १३२भुसावळ विभाग :१६९ मुले, १०१ मुली, एकूण २७०पुणे विभाग : १९८ मुले, ८ मुली, एकूण २०६सोलापूर विभाग : ३७ मुले, २४ मुली, एकूण ६१