लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली असून रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला विशेष सूचना देण्यात आल्या असून रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी विभागातील सर्व निरीक्षकांची बैठक आयोजित करून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालींवर लक्ष देण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय श्वान पथकाद्वारे प्रत्येक प्लॅटफार्मची तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे गाड्यातही अनुचित घटना घडू शकते यामुळे रेल्वेगाड्यात गस्त घालणाऱ्या आरपीएफच्या जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विभागातील प्रत्येक रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करूनच त्यांना रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश देण्यात येत आहे.आरपीएफ सज्ज‘प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दल सज्ज आहे. रेल्वेस्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संशयित व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. श्वान पथक, स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमच्या साहाय्याने गस्त घालण्यात येत आहे.’-ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल
प्रजासत्ताक दिनासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आरपीएफचा कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 10:51 PM
प्रजासत्ताक दिनानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी रेल्वे सुरक्षा दलाने कंबर कसली असून रेल्वेस्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. स्पेशल क्राईम डिटेक्शन टीमला विशेष सूचना देण्यात आल्या असून रेल्वेस्थानकावरील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे.
ठळक मुद्देहाय अलर्ट जारी : रेल्वेगाड्यातही होणार तपासणी