शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

नागपुरात अ‍ॅमेझॉन कंपनीला ७.६३ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:02 AM

ऑनलाईन उत्पादनांची विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वस्तूंची ग्राहकांना डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीची ७.६३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.

ठळक मुद्देडिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन उत्पादनांची विक्री करणाऱ्या अ‍ॅमेझॉन कंपनीच्या वस्तूंची ग्राहकांना डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीची ७.६३ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपी कर्मचारी ग्राहकांनी रद्द केलेल्या ऑर्डरच्या वस्तूंऐवजी दुसऱ्या वस्तू कंपनीला पाठवून सात महिन्यांपासून कंपनीची फसवणूक करीत होते. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.आकाश गोविंदराव निमजे (२४) पाचपावली, नरेश कडू (३२) जरीपटका, यशवंत शिखाराम धार्मिक (२१) शांतिनगर, रूपेश सुधाकर सावरकर (२५) इतवारी आणि हर्षल जागेश्वर आत्राम (२५) पाचपावली, अशी आरोपींची नावे आहेत.अ‍ॅमेझॉन कंपनीने डिपोंडा लॉजेस्टिक कंपनीकडे ग्राहकांना वस्तूंची डिलिव्हरी करण्याचे काम सोपविले आहे. डिपोंडामध्ये कळमना येथील रहिवासी भोजराज माकडे टीम लीडर आहे. सर्व आरोपी माकडे यांच्याकडे डिलिव्हरी देण्याचे काम करीत होते. ग्राहक अनेकदा ऑनलाईन ऑर्डर रद्द करतात. अशावेळी सर्व वस्तू कंपनीला परत पाठविण्यात येतात. आरोपींनी २ मे ते २८ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ग्राहकांनी परत केलेल्या ७ लाख ६३ हजार २७३ रुपयांच्या वस्तू आपल्याजवळ ठेवल्या आणि त्याऐवजी दुसऱ्या वस्तू पॅक करून कंपनीला पाठविल्या. कंपनीने तपासणी केल्यानंतर आरोपींनी फसवणूक केल्याचे आढळून आले. याप्रकरणी माकडे यांनी गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी