लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.१७ नोव्हेंबरच्या रात्री २२४१५ एपी एक्स्प्रेसचे मुख्य तिकीट निरीक्षक महेश कुमार पटेल यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. या गाडीच्या बी १ कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे तीन पाकिटे बेवारस स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही गाडी रात्री २.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर आली. यावेळी सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, एस. बी. कामिलकर, संदीप डोंगरे, सहायक उपनिरीक्षक अनिल कुंवर यांनी बी १ कोचच्या शौचालयाची तपासणी केली. यावेळी त्यांना प्लायवूडच्या मागे तीन खाकी रंगाची पाकिटे आढळली. त्यानंतर श्वान रेक्सद्वारे या पाकिटाची तपासणी केली असता श्वानाने पाकिटात मादक पदार्थ असल्याचा संकेत दिला. तिन्ही पाकिटे उघडून पाहिली असता त्यात ६० हजार रुपये किमतीचा सहा किलो गांजा आढळला. कागदोपत्री कारवाईनंतर निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशावरून सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल यांनी हा गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केला.रेल्वेस्थानकावर दारूच्या १०७ बॉटल जप्त : दोघांना अटक
नागपुरात एपी एक्स्प्रेसमध्ये ६० हजारांचा गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:15 PM
एपी एक्स्प्रेसच्या बी १ या एसी कोचच्या शौचालयातील प्लायवूडच्या मागे बेवारस पाकिटे असल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने रात्री २.३० वाजता या गाडीची तपासणी करून ६० हजार रुपये किमतीचा ६ किलो गांजा जप्त केला.
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द