लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात दलित, मुस्लीम, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत़ आसिफाचे प्रकरण ताजे आहे़ उठताबसता राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवारातील संघटनांचे लोक या विषयावर गप्प आहेत. त्यांचा राष्ट्रवाद फसवा आहे, असा घणाघाती आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील विद्यार्थी नेत्या शेहला रशीद यांनी केला़रिपब्लिकन युथ फेडरेशनतर्फे शुक्रवारी ‘वर्तमान स्थिती व लोकतांत्रिक आव्हाने’ या विषयावर शेहला रशीद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले़ सीताबर्डी परिसरातील अमृत भवन येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी जेएनयूतील मोहित पांडे यांचीही विशेष उपस्थिती होती़ व्यासपीठावर शहीद भगत सिंग विचार मंचचे गुरुप्रित सिंग, बानाई संघटनेचे पदाधिकारी जयंत इंगळे, रिपब्लिकन युथ फेडरेशनचे अध्यक्ष राहुल जारोंडे उपस्थित होते़ रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने अध्यक्षस्थानी होते.शेहला रशीद म्हणाल्या, ७०० वषार्पूर्वी या देशात एक राजा आला. त्याने मंदिर पाडून मशीद बांधली़ त्या मुद्यावंर आरएसएस आजही राजकारण करीत आहे़ पण, उणामध्ये काय झाले, नोटबंदीत लोकांचे कसे हाल झाले, यावर ते बोलत नाही़ आसिफावर अत्याचार झाला़ तिला मंदिरात ठेवण्यात आले़ भाजपा आणि याच परिवारातील एका ‘मंच’चा यात सहभाग असून खरे तर हीच भाजपाची संस्कृती आहे़ हे लोक हिंदू एकतेच्या गोष्टी करतात़ अन् बलात्काऱ्यांना वाचविण्यासाठी तिरंगा यात्राही काढतात़ देशात महिलांवर अत्याचार होत असताना भाजपाची ‘बलात्कारी बचाव’ मोहीम सुरू आहे़ सामाजिक न्यायाची कुचंबणा होत असताना राष्ट्रवादी म्हणवणारे बोलत नाही़ तर, जे लोक या अन्यायाविरोधात बोलतात त्यांना राष्ट्रविरोधी ठरविले जाते, अशी खंतही शेहला रशीद यांनी व्यक्त केली़ रमेश जीवने व जयंत इंगळे यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक गुरप्रित सिंग यांनी केले. संचालन दीपक डोंगरे यांनी केले़. राहुल जारोंडे यांनी आभार मानले.आरक्षणाआधी जाती संपवादेशातील आरक्षण संपवावे, अॅट्रॉसिटी अॅक्ट रद्द करावा यासाठी हे तथाकथित राष्ट्रवादी लोक प्रयत्न करीत आहेत़ आरक्षण संपवायचे असेल तर आधी त्यांनी जाती संपवाव्यात़ अॅट्रॉसिटी संपवा अॅक्ट आपोआप रद्द होईल़ बिमारी कायम असताना औषध बंद करण्याचे कारस्थान रचू नये, असे रशीद म्हणाल्या़चुका टाळा-एकत्र याया देशातील अराजकेतविरोधात डावे आणि आंबेडकरी विचारांना मानणारे लोक संघर्ष करीत आहेत़ मात्र आम्हाला आपल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील़ चुका झाल्या म्हणूनच भाजपाला संधी मिळाली़ आता दोन्ही घटकांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचेही रशीद यांनी नमूद केले़देशात अराजक, चौकीदार गप्प?राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात हिंदू एकता आणू पाहत आहे़ पण त्यांच्या हिंदू एकतेत दलित, मुस्लीम, महिलांना स्थान नाही़ देशात अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत असताना देशाचा चौकीदार मात्र गप्प आहे़ आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते़ जनरल डायरने ते घडविले होते़ आजही देशात जनरल डायर अस्तित्वात असून ते लोकांमधून निवडून आल्याचे सांगत मोहित पांडे यांनीही भाजपा सरकारवर तोफ डागली़