लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर्चा आहे. यंदा या वर्गाच्या समारोपाला कोण अतिथी राहणार, याबाबत संघाने अद्यापपर्यंत गुप्तता बाळगली आहे.तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्ग संघात महत्त्वाचा मानला जातो. देशभरातील विविध प्रांतांमधील स्वयंसेवक यात सहभागी होतात. तृतीय वर्ष वर्गासाठी स्वयंसेवकांची काही विशिष्ट निकषांद्वारे निवड करण्यात येते. संघाच्या सर्व प्रांतांमध्ये जिल्हा पातळीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच तहसील पातळीवर दोन वर्षांहून अधिक काम केलेल्या स्वयंसेवकांना येथे संधी देण्यात येते. दरवर्षी साधारणत: १० ते १५ मेच्या दरम्यान हा वर्ग सुरू होतो. मात्र यंदा लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अखेरचा टप्पा १९ मे रोजी आहे. संघ जरी निवडणुकांमध्ये सक्रियतेने सहभागी नसला तरी संघाचे स्वयंसेवक विविध माध्यमांतून निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्याच्या अगोदरपासूनच ‘शत-प्रतिशत’ मतदानासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात आले. यासाठी स्वयंसेवकांनी गावपातळीपासून ते अगदी सोशल चावडीपर्यंत मोहिमच राबविली होती. अखेरच्या टप्प्पाचे मतदान १९ मे रोजी आहे. यात बिहारमधील सहा, हिमाचल प्रदेशमधील चार, झारखंड येथील तीन, मध्य प्रदेशमधील आठ, पंजाबमधील सर्वच्यासर्व १३, उत्तर प्रदेशमधील १३, पश्चिम बंगालमधील नऊ जागांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी संघ परिवारातील संघटनांचे प्रयत्न सुरू आहे. अशास्थितीत या भागांमधील स्वयंसेवकांना तृतीय वर्ष वर्गात येता यावे यासाठी यंदा वर्गाचे आयोजन उशिरा करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतरच तृतीय वर्ष वर्गाला सुरुवात झाली होती.संघ वर्ग सुरू होण्याची तारीखवर्ष तारीख२०१४ १९ मे२०१५ ११ मे२०१६ १६ मे२०१७ १५ मे२०१८ १४ मे
निवडणुकांमुळे लांबला संघाचा तृतीय वर्ष वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:47 AM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष वर्ग मागील वर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीमुळे प्रकाशझोतात आला होता. साधारणत: मेच्या मध्यात सुरू होणारा हा वर्ग यंदा २२ मेपासून सुरू होणार आहे. लोकसभा निवडणुकांमुळे हा वर्ग लांबला असल्याची चर्चा आहे. यंदा या वर्गाच्या समारोपाला कोण अतिथी राहणार, याबाबत संघाने अद्यापपर्यंत गुप्तता बाळगली आहे.
ठळक मुद्दे२२ मेपासून सुरुवात : यंदा कोण राहणार अतिथी?