नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रविवारी पार पडली. केवळ २२.९७ टक्के इतकेच मतदान झाले. आज मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर विद्यापीठ सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके कमी मतदान झाले. मागील निवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची वाढलेली संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. निवडणुकीबाबत पदवीधर मतदारांमध्ये सकाळपासूनच फारसा उत्साह दिसून आला नाही. नागपूर विद्यापीठ क्षेत्रातील जिल्हानिहाय विचार केला तर वर्धेत सर्वाधिक २६.११ टक्के इतके मतदान झाले. सर्वात कमी मतदान भंडारा येथे २०.५१ टक्के इतके झाले. मंगळवारी सकाळी १० वोपासून मतमोजणीला सुरुवात झाली.
- असे झाले जिल्हानिहाय मतदान
नागपूर शहर : २३.१४ टक्केनागपूर ग्रामीण : २५.६५ टक्केभंडारा : २०.५१ टक्केगोंदिया : २१.५३ टक्केवर्धा : २६.११ टक्के