नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांमधील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांची घाेषणा करण्यात आली आहे. काेराडी येथील तायवाडे महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. शरयू तायवाडे यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ तर रायसाेनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डाॅ. प्रमाेद वाळके आणि आर. एस. मुंडले, धरमपेठ महाविद्यालयाच्या डाॅ. मंजुश्री सरदेशपांडे यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात साेमवारी या मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. शिक्षक कल्याण निधी अंतर्गत दरवर्षी शिक्षक, प्राचार्य, संशाेधक, लेखक आदींकडून विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविले जातात. या अर्जांनुसार विविध स्तरावरील आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. यावर्षी ‘उत्कृष्ट लेखक’ म्हणून डाॅ. धनंजय गभणे यांची निवड करण्यात आली आहे.
याशिवाय डाॅ. मंगेश भाेरकर यांची ‘उत्कृष्ट शिक्षक’, डाॅ. नीलेश महाजन व डाॅ. स्मिता आचार्य यांना ‘उत्कृष्ट संशाेधक’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. यादरम्यान विद्यापीठाच्या वित्त विभागाचे उपकुलसचिव मनीष झाेडापे यांना स्व. बलराज अहेर सुवर्णपदक प्रदान करण्यात येईल. यासह विद्यापीठाच्या तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. ५ सप्टेंबर राेजी शिक्षक दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नीरीचे संचालक डाॅ. अतुल वैद्य तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी, प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
पुरस्कारप्राप्त शिक्षक
उत्कृष्ट प्राचार्य : डाॅ. शरयू तायवाडे
उत्कृष्ट शिक्षक : डाॅ. प्रमाेद वाळके व डाॅ. मंजुश्री सरदेशपांडे
उत्कृष्ट संशाेधक : डाॅ. नीलेश महाजन व डाॅ. स्मिता आचार्य
उत्कृष्ट शिक्षक : डाॅ. मंगेश भाेरकर
उत्कृष्ट लेखक : डाॅ. धनंजय गभणे