शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

आरटीओत आॅनलाईनचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 2:04 AM

परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली.

ठळक मुद्देई-पेमेंटमुळे वाढतेय डोकेदुखी : ‘सारथी’, ‘वाहन’मधून सुविधा कमी असुविधाच जास्तअर्जदारांच्या सोर्इंसाठी हे व्हावेआरटीओतील कर्मचारी ते अधिकाºयांना ‘वाहन’ व ‘सारथी’चे प्रशिक्षण द्यायला हवे.यातील तांत्रिक समस्या सोडविण्यासाठी कार्यालयात पदभरती व्हायला हवी.आरटीओ कार्यालयात सीएससी’ सेंटर सुरू करायला हवे.कार्यालयाच्या आत येणाºयांची सुरक्षा रक्षकांकडून कामाची तपासणी व्हायला हवी.रोख शुल्क भरण्याची खिडकी असायला हवी.आॅनलाईन अर्ज भरण्याची सध्याची पद्धत किचकट आहे ती सोपी व्हायला हवी.अर्जात ५०० केबीच्या डाऊनलोडची समस्या दूर व्हायला हवी.‘पेपरलेस’ कामाला गती द्यायला हवी.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिवहन विभागाने वाहनधारकांच्या डोळ्यापुढे ‘ई-स्वप्न’ रंगवित राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयांमध्ये ‘सारथी ४.०’ व ‘वाहन ४.०’ या अत्याधुनिक प्रणालीला सुरुवात केली. परंतु पाच-सहा महिन्यावर कालावधी होऊनही आॅनलाईन प्रणालीचा गोंधळ कमी होण्यापेक्षा वाढतच आहे. विशेष म्हणजे, नुकतेच करण्यात आलेल्या ई-पेमेंटच्या सक्तीमुळे गोंधळात भर पडली आहे. साध्या लर्निंग लायसन्सच्या १५० रुपयांच्या शुल्कासाठी अतिरिक्त १०० रुपयांचा भुर्दंड पडत आहे. यातही हे पैसे जमा व्हायला २४ तासांवर वेळ लागत असल्याने कार्यालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. आरटीओ अधिकाºयांना रोज अशा व इतरही समस्या घेऊन येणाºया अर्जधारकांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.आरटीओ कार्यालयामधील नव्या ‘वेब बेस’ प्रणालीमध्ये सर्व शिकाऊ परवाने, कायमस्वरूपी परवाने, टॅक्स, मोठ्या वाहनांचे परवाने, व्यावसायिक वाहनांचे परवाने, चॉईस नंबर, अशा सर्व प्रकारची माहिती व विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोबतच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अर्जासोबत डाऊनलोड करणेही येथे शक्य आहे.अर्जदारास त्या अर्जाचे स्टेट्सही कळते. ‘ई-पेमेंट’द्वारेच शुल्क भरण्याची सोयही आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीमुळे काम करणे अत्यंत सुलभ असून, कामात सुसूत्रता, वेळेची बचत असल्याचे परिवहन विभाग म्हणणे आहे. परंतु प्रत्यक्षात याच्या उलट चित्र असल्याने अर्जधारकांना विविध समस्येला तोंड द्यावे लागत आहे.प्रथम ‘सीएससी’ सेंटरवर जा आणि नंतर या कार्यालयातपरिवहन विभागाने आॅनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड, शुल्क भरणे आदी कामे कॉमन सर्व्हिस सेंटरला (सीएससी) दिली आहेत. नागपुरात अशी २०० वर ‘सीएससी’ सेंटर आहे. हे सेंटर शासकीय शुल्काशिवाय वाहनधारकांकडून २० रुपये सेवा शुल्क घेते. ही सेंटर आरटीओ कार्यालयात न ठेवता शहरात विविध ठिकाणी दिली. परिणामी, वाहनधारकाला प्रथम या सेंटरवर जाऊन नंतर कार्यालयात यावे लागते. यामुळे वाहनधारकांच्या चकरा वाढल्या आहेत.दलाल झाले ‘स्मार्ट’आरटीओ कार्यालयात दलालांना चाप बसण्यासाठी आॅनलाईन प्रणालीसह ‘सीएससी’ सेंटरच्या माध्यमातून कामकाजावर भर दिला जात आहे. परंतु दलालांनी स्वत:ला ‘स्मार्ट’ करीत आरटीओ कार्यालयाच्या बाहेर लॅपटॉप, इंटरनेट, डेबिट, क्रेडीट कार्ड, मोबाईल बॅकिंगच्या माध्यमातून कामे सुरू केली आहे. यात अर्ज भरण्यापासून ते अपलोड करण्यासाठी १५० रुपये शुल्क आकारले जात आहे. तर ‘ई-पेमेंट’साठी १०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क घेतले जात आहेत. हे सर्व आरटीओ कार्यालयाच्या नजरेसमोर सुरू आहे.‘ई-पेमेंट’लाही वेटिंगकालपर्यंत नागपुरातील सर्वच आरटीओ कार्यालय शुल्क स्वीकारत होते, परंतु अचानक या तीनही कार्यालयात ‘ई-पेमेंट’ची सक्ती करण्यात आली आहे. यातही ‘ई-पेमेंट’ केल्यावर सुमारे २४ तासांची प्रतीक्षा (वेटिंग) दाखवत असल्याची अजब बाब सुरू असून वाहनधारक अडचणीत आले आहेत. ‘ई-पेमेंट’ची सक्ती नागरिकांना सेवा मिळविण्याच्या अधिकारावर प्रतिबंध घालणारी असल्याचे बोलले जात आहे.अर्जदारांना अधिकाºयांची मदत मिळायला हवीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्याकडे तीन कार्यालयांचा कारभार आहे. असे असताना, त्यांच्याकडे कोणी ‘आॅनलाईन’ची तक्रार घेऊन गेल्यास तत्काळ त्याचे निराकरणाचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. शनिवारी त्यांच्याकडे ‘ई-पेमेंट’ची तक्रार घेऊन गेलेल्या एका अर्जदाराला आॅनलाईन ‘ई-पेमेंट’ कसे केले जाते याचे स्वत:च्या संगणकावर प्रशिक्षणच दिले.