श्रीवास्तव यांनी बॉटनीमध्ये एमएस्सी आणि दिल्ली विद्यापीठातून एलएलबीची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नवी दिल्ली येथून एलएलएमची (प्रोफेशनल) पदव्युत्तर पदवी मिळविली. त्या कॉर्पोरेट प्रकरणाच्या मंत्रालयांतर्गत आयआयसीएद्वारे ठेवण्यात येणाऱ्या डाटा बेसमध्ये स्वतंत्र संचालक म्हणून नोंदणीकृत आहेत. त्यांनी आयकर विभागासह केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर आपली सेवा दिली आहे. आयकर विभागात त्यांनी वर्ष १९८८ मध्ये सहायक आयुक्त म्हणून नागपुरातून सेवा सुरू केली आहे. प्रतिनियुक्तीवर नवी दिल्ली येथे संघ लोकसेवा आयोग व वाणिज्य मंत्रालयात जाण्यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अन्वेषण विंगमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्य केले आहे.
प्रधान मुख्य आयकर आयुक्त नागपूर विभागाचा कार्यभार ग्रहण करण्यापूर्वी त्या परमाणु ऊर्जा विभागांतर्गत सरकारचा उपक्रम एनपीसीआयएलच्या बोर्डवर संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी दुपारी ३ ते ४ या वेळात करदाता आणि त्यांच्या प्रतिनिधींशी करसंबंधित समस्यांसाठी मुलाखतीची वेळ निश्चित केली आहे.